सोयाबीनला येणार अच्छे दिन, हे आहे कारण. जाणून घ्या आजचे दर
लातूर शहर परिसरात सोयाबीनवर प्रक्रिया करणार ३ सोया प्लॅन्ट सुरु झाले आहे. त्यामुळे कर्नाटक राज्यातील शेतकऱ्यांसाठी देखील अच्छे दिन आले आहे असे म्हणता येईल.
तर लवकरच सोयाबीनला १० हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळेल. या आशेने शेतकऱ्यांनी अजूनही सोयाबीनची साठवणूक करून ठेवली आहे. पुढच्या वर्षीपासून शेतकऱ्यांना सोयाबीनची विक्री बाजारात न करता थेट सोया प्लॅन्ट ला देता येईल.
हे ही वाचा (Read This ) या ९० दिवसीय पिकाची लागवड करून मिळवा भरगोस उत्पन्न, आंतरपिकासाठी उत्तम पर्याय
सोयाबीनचे आजचे दर
थेट शेतकऱ्यांकडून करणार खरेदी
उदगीर व परिसरातील बामणी पाटी, करडखेल पाटी व उदगीर शहराजवळील नळेगाव रस्त्यावर झालेल्या सोया प्लॅन्टमध्ये दररोज १५ हजार क्विंटल सोयाबीनवर प्रक्रिया केली जाणार आहे. सोया प्लॅन्टसाठी लागणारे सोयाबीन हे थेट शेतकऱ्यांकडून खरेदी केले जाणार आहेत.
यासाठी प्लॅन्ट मालकांनी शेतकऱ्यांच्या दारी जाऊन त्यांचा मोबाईल क्रमांक, बँकेचा खाते क्रमांक, आधार कार्ड क्रमांक जमा करून त्यांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले आहे.
शेतकऱ्यांना मिळणार अधिकच भाव
सोयाबीन प्रक्रिया उद्योगात बाजारापेक्षा अधिकच भाव मिळतो. तर शेतकऱ्यांना आता रोज सोयाबीनचा भाव देखील कळेल. त्यामुळे पुढच्या वर्षी बाजारात सोयाबीनची आवक जेमतेम दिसण्याची शक्यता आहे.
उन्हाळी सोयाबीनची स्थिती
यंदा उन्हाळी सोयाबीनचा पेरा वाढला आहे. उत्पादनवाढीच्या अनुशंगाने शेतकऱ्यांनी हा प्रयोग केला आहे. शिवाय पोषक वातावरणामुळे सोयाबीन हे बहरात असून आता काढणी कामाला सुरवात होणार आहे. पण याची काढणी करताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
सोयाबीनच्या शेंगा ९० टक्के पिवळ्या झाल्यावरच काढणी योग्य राहणार आहे. उशिर झाला तर मात्र दाणे गळण्याचा धोका निर्माण होतो.शेतकऱ्यांनी स्प्रिक्लंर, ठिबकचा वापर करून पिकाची जोपासना केली आहे. सोयाबीनला मुबलक दर मिळाले नाही तरी भविष्यातील बियाण्यांचा प्रश्न मिटणार आहे.
हे ही वाचा (Read This ) हायब्रीड कारले लागवडीतून घ्या भरगोस उत्पन्न
हरभरा आणि तुरीचे दर कसे आहेत?
उदगीर बाजारपेठेत सोयाबीनला प्रति क्विंटल प्रमाणे ७ हजार २२० दर होता. तर सध्या हरभरा आणि तुरीची आवक देखिल वाढली आहे. हरभऱ्यास प्रति क्विंटल ४ हजार ६५० दर तर तुरीला ६ हजार ६०० असा दर मिळत आहे.