अशी करा केळी लागवड : कमाई होईल लाखोंची …
पुरेसे पाणी उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी केळी लागवड उत्तम फायदा देऊन जाते. हंगामानुसार होणारे वातावरणातील बदल, वेगाने वाहणारे वारे, गारपिटीची शक्यता आणि अशा सर्वांमधून पिकांवर होणारे विपरीत परिणाम अशा सर्व बाबींचा विचार करून केळीच्या लागवडीसाठी फेब्रुवारी महिना योग्य ठरतो. केळी झाड वाढीसाठी हा काळ उत्तम आहे. मुख्यतः केळीच्या झाडावर पणामा, शेंडे, झोका यांसारखे हानिकारक रोग पडतात त्यामुळे त्याची अति काळजी घेणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे औषध फवारणी देणे गरजेचे आहे.
असे करा केळीचे व्यवस्थापन !
१) आधी पाहिल्याप्रमाणे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेती मध्ये ५ X ५ फुटाच्या अंतरावर खड्डे करून केळीच्या झाडांची लागवड योग्यरीतीने करावी.
२) केळीच्या झाडे कापणीस यायला सुमारे एक वर्षाचा काळ लागतो. म्हणजे जर फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केळीची लागवड केली तर पुढच्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये केळी ची झाडे कापणीला येतात.
३) वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांपासून केळीच्या झाडांचे रक्षण करण्यासाठी केळीची लागवड करताना जवळपास २ मीटर अंतरावर कडेकडेने शेवरीच्या झाडांची लागवड करावी कुंपण केल्याप्रमाणे करण्यात आलेल्या या लागवडीमुळे वेगाने वाहून येणारे वारे हे शेवरीच्या झाडांना अडवले जाते आणि केळीच्या झाडांचे नुकसान होण्या पासून थांबवते. या मुळे वादळी वाऱ्यामुळे फाटली जाणारी केळीची पाने फाटत नाहीत आणि चांगली राहतात. या शेवरीमुळे ऋतूनुसार बदल होणारे उष्ण आणि थंड वाऱ्यांपासून केळीच्या झाडांचे संरक्षण होते.
४) शेवरीचे कुंपण केल्यामुळे केळीची झाडे कोलमडत नाहीत. केळी लागवडीनंतर २१० दिवसांनी नत्राची मात्रा प्रत्येक झाडाला युरिया मधून द्यावी. वेळोवेळी मशागत करून काळजी घ्यावी म्हणजे जमीन कायम भुसभुशीत राहील.
५) केळीच्या झाडांना मुबलक पाणी लागत असते. झाडांना देण्यात आलेले पाणी हे खोडा मध्ये साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी.
६) पाणी देण्याचे प्रमाण हे केळीचे झाडांच्या वाढीवर अवलंबून असावे. अतिकडक उन्हाळ्यात केळीच्या झाडांना ५ ते ६ दिवसांनी पाणी देणे आवश्यक आहे. केळीचे एक पीक घ्यायला सुमारे अठरा महिने लागतात, म्हणजेच या एका पिकाच्या कालावधीमध्ये पिकाला सुमारे ५० ते ७० वेळा पाणी द्यावे लागते.
दीर्घकालीन असणारी केली लागवड जर शेतकऱ्यांनी केली आणि तिचे योग्य त्या प्रमाणात व्यवस्थापन केले, तर खात्रीशीर फायदा होतो हे निश्चित.
ब्युरो रिपोर्ट – किसानराज डेस्क