इतर बातम्या

अर्थसंकल्प २०२२-२३ – शेतकऱ्यांसाठीच्या या महत्वाच्या घोषणा, एकाच बातमीत

Shares

अर्थमंत्री अजित पवारने वर्ष २०२२-२३ चा अर्थसंकल्प जाहीर केला यात शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या घोषणा दिल्या.

भुविकास बँकांचे ३४ हजार ७८८ कर्जदार शेतकऱ्यांकडे असणारे ९६४ कोटी १५ लाख रुपयांचे कर्ज माफ करण्याची मोठी घोषणा अजित पवार यांनी केली आहे. त्याचबरोबर भूविकास बँकेच्या जमिनी आणि इमारती यांचा वापर यापुढे शासकीय योजनांसाठी करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत काही बदल करण्याची विनंती केली होती. तर यामध्ये काही बदल केले गेले नाहीत तर शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई साठी अन्य पर्यायांचा विचार केला जाईल असे पवार यांनी सांगितले.

महत्वाच्या घोषणा

  • शेतकरी कल्याणासाठी अधिक अनुदान देण्यात येणार.
  • नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे.
  • हिंगोलीमध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारण्याची घोषणा.
  • दोन वर्षात १०४ सिंचन प्रकल्प पूर्ण करणार असल्याची घोषणा. त्याचबरोबर गोसीखुर्द
    प्रकल्पासाठीच्या कामासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
  • कोकण आणि परभणी कृषी विद्यापीठाला ५० कोटींचा निधी देण्याची घोषणा.
  • जलसंपदा विभागाला १३ हजार २५२ कोटी रुपयांच्या निधीची तरतदू.
  • भरड धान्यावर विशेष भर देण्यात येईल.
  • पंतप्रधान सिंचन योजनेतून ११ प्रकल्प पूर्ण करण्यात येईल.
  • शेततळ्यासाठी अनुदानामध्ये वाढ करण्याची घोषणा. ७५ हजार रुपयांचे अनुदान.
  • राज्यात ३ मोबाइल प्रयोगशाळा उभारणार जेणेकरून देशी गाई, बैलांच्या उत्पादकतेत वाढ होईल.
  • प्रत्येक महसूल विभागात प्रत्येकी एक शेळी प्रकल्प.
  • ६० हजार कृषी पंपांना वीज पुरवठा.
  • १ लाख हेक्टर क्षेत्रावर फळबागा उभारण्याचे लक्ष्य.
  • मुंबई येथील पशुवैद्यकीय महाविद्यालय १० कोटींचा निधी.

कोरोना काळात राज्यातील विकासावर विपरीत परिणाम झाला असून याचा प्रभाव राज्याच्या अर्थकारणावर झाला आहे. आता राज्याचा आर्थिक विकास गतीने व्हावा यासाठी येत्या ३ वर्षात ४ लाख कोटी उपलब्ध करण्यात येणार आहे.

agriculture budget 2022-23
agriculture budget 2022-23
agriculture budget 2022-23
agriculture budget 2022-23
Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *