योजना शेतकऱ्यांसाठी

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना २०२२, मिळवा मोफत अन्नधान्य

Shares

सरकार प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत गरीब शेतकरी आणि नागरिकांना दरमहा ५ किलो तांदूळ किंवा गहू, डाळ, तेल, साखर, मीठ मोफत दिले जाते. या योजनेचा मुख्य उद्देश देशातील गरीब शेतकरी आणि लोकांची भूक मिटवण्याचा आणि त्यांना आर्थिक मदत करण्याचा आहे.

या योजनेअंतर्गत देशातील ८० कोटी लोकांना मोफत रेशन दिले जात आहे. देशातील सर्व नागरिक ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे ते या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

हे ही वाचा (Read This) प्रधान मंत्री मोफत सोलार पॅनल योजना २०२२, योजनेसाठी असा करा अर्ज

या योजनेच्या काही महत्वाच्या बाबी

  • देशातील सर्व नागरिक ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे ते या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • केंद्र सरकारने ८० कोटी लोकांना रेशन सबसिडी दिली आहे.
  • तीन महिन्यांसाठी रेशन कार्ड धारकांना 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये प्रति किलो तांदूळ नागरिकांना दिला जाणार आहे.
  • या योजनेअंतर्गत, सरकारने आतापर्यंत ५.२९ कोटी लोकांना २.६५ टन मॅट्रिक रेशनचे वाटप केले आहे.

हे ही वाचा (Read This) असा काढा घरी बसून जमिनीचा ऑनलाईन नकाशा, महाभूमी अभिलेख

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची नोंदणी करण्याची गरज नाही. तर केवळ तुमच्याकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. तुम्ही तुमचे रेशन कार्ड राशन दुकानामध्ये दाखवून अगदी कमी किमतीमध्ये राशन खरेदी करू शकता.

हे ही वाचा (Read This) कुक्कुटपालन,शेळीपालन,शेतमाल आदीसाठी ६०% अनुदान, ३१ मार्चपूर्वी असा करा अर्ज

खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता

https://www.xn--i1bj3fqcyde.xn--11b7cb3a6a.xn--h2brj9c/

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *