सोयाबीन लवकरच १० हजार पार ? शेतकऱ्यांचा नव्हे व्यापाराचा फायदा
सध्या युक्रेन-रशिया युद्धामुळे सोयाबीन सह खाद्यतेल, गहू, तांबे, पोलाद, ऍल्युमिनिअम यांच्या किमतींमध्ये देखील वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. याचा फायदा व्यापाऱ्यांनी घेतला असून मुबलक प्रमाणात साठा असूनही त्यांनी चढ्या भावाने वस्तू विकण्यास सुरुवात केली आहे.
सोयाबीनच्या दरामध्ये सतत चढ उतार होत होती. तर आता हे दर स्थिर झाले असले तरी सोयाबीन तेलाच्या किमतीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय स्थरावर निर्माण झालेली सध्याची परिस्थिती.
याचा परिणाम इतर अनेक गोष्टींवर होत आहे,. तर अशीच परिस्थिती राहिली तर सोयाबीनच्या दरामध्ये अधिक वाढ होऊन लवकरच सोयाबीन १० हजार पार करेल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
हे ही वाचा (Read This) कुक्कुटपालन,शेळीपालन,शेतमाल आदीसाठी ६०% अनुदान, ३१ मार्चपूर्वी असा करा अर्ज
सोयाबीनला थोडा चांगला दर मिळताच अनेक शेतकऱ्यांनी साठवणूक केलेला सोयाबीन बाजारामध्ये विक्रीसाठी काढला होता. आता काही प्रमाणातच सोयाबीन राहिला आहे. तर त्याचा फायदा व्यापाऱ्यांना नक्कीच होणार आहे.
तूर्तास गव्हाच्या किमतींमध्ये वाढ नाही …
गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेशातून गहू २४०० रुपये प्रति क्विंटल ते २४५० रुपये प्रति क्विंटल दराने निर्यात केले जात आहे. गव्हाच्या किमतीमध्ये २० टक्क्याने वाढ झाली आहे.
सरकारी गोदामांमध्ये मुबलक प्रमाणात धान्यसाठा उपलब्ध असल्यामुळे सध्या गव्हाच्या किमतीमध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता नाही, असे कृषी आणि खाद्य तज्ञ देवेंद्र शर्मा यांनी सांगितले आहे.
खाद्यतेलाच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. अजून ६ महिने खाद्यतेल पुरेल एवढा साथ असून देखील खाद्यतेलाच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. याच परिणाम शेतीबरोबर खाण्यापिण्याच्या पदार्थांच्या किमतीवर होणार आहे.
… यांच्या भावात देखील वाढ होणार
- युद्धामुळे रशियाने जहाजमार्गे निर्यातीवर बंदी केल्यामुळे आता शेतमालाच्या किमतींमध्ये वाढ होणार आहे.
- रशियाच्या निर्बंधामुळे गॅसची टंचाई निर्माण होऊन गॅसच्या दरामध्ये वाढ होण्याची शकता आहे.
- निकेल धातूला उच्चांक दर मिळत असल्यामुळे अलंकार, दागिन्यांचे धातुकाम, रासायनिक उपकरणे, सागरी उपकरण यांच्या किमतींमध्ये वाढ होणार आहे.
- तांब्याच्या किमतीही आता वाढल्या आहेत. त्यामुळे विद्युत जनित्रे व चलित्रे (मोटारी), विद्युत संवाहक तारा, केबल, गज, मोटारगाडीतील उपकरणे, दारुगोळा, रेडिओ, दूरचित्रवाणी, घड्याळे देखील महाग होण्याची दाट शक्यता आहे.
हे ही वाचा (Read This) शेतीसाठी हे औषध एक उपाय अनेक !