कापूस सोयाबीन प्रमाणेच आताची बाजारातील तुरीची स्थिती

Shares

उत्पादनात घट झाली की दरात वाढ होते असा बाजारपेठेचा नियमच आहे. मात्र सध्या सगळं उलटं होतांना दिसत आहे. त्यामुळे अनेकांनी आता याचा अभ्यास, बारीक निक्षण करण्यास सुरुवात केली आहे. उत्पादनात घट होऊन देखील अपेक्षेप्रमाणे दर मिळत नसतील तर विक्री का करावी? शेतकरी अशी भूमिका घेत आहेत.

शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे दर मिळत नसल्यामुळे सोयाबीन, कापूसच्या साठवणुकीचा निर्णय घेतला होता. त्यामुळेच हंगामाच्या अंतिम टप्प्यात यास विक्रमी दर मिळत आहे. तर यंदा अवकाळी तसेच शेंग पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव तूर पिकावर झाला असल्याचे चित्र दिसून आले. मात्र उत्पादनात घट होऊन देखील बाजारपेठेमध्ये हमीभाव मिळत नाहीये.

हंगाम सुरु होऊनही लातूर बाजार समितीमध्ये अपेक्षित आवक नसल्याने आता प्रक्रिया उद्योजक आणि स्टॉकिस्ट यांनी तूर खरेदीला सुरवात केली आहे.

तुरीच्या दरात सुधारणा
शेतीमालाची आवक कमी झाली की, त्याचा परिणाम हा दरावर होणारच. शिवाय यंदा खरिपातील पिकांते उत्पादन घटले असतानाही वाढीव दर कसा नाही. त्यामुळे शेतकरी शेतीमाल विक्रीपूर्वी बाजारपेठेतील दराची माहिती करुन घेत आहेत.

हंगाम सुरु होऊनही लातूर बाजार समितीमध्ये अपेक्षित आवक नसल्याने आता प्रक्रिया उद्योजक आणि स्टॉकिस्ट यांनी तूर खरेदीला सुरवात केली आहे. त्यामुळेच गतआठवड्यात तुरीच्या दरात २०० रुपायांची सुधारणा झाली आहे. यातच तूरदाळीला उठाव मिळाल्यानेही त्याचा दरावर परिणाम झालेला आहे.

सध्या देशभरात ५ हजार ९०० ते ६ हजार ६०० पर्यंत तुरीचे दर आहेत. असे असले तरी तुरीची आवक ही नियंत्रणातच सुरु आहे. चांगला दर मिळाला तरच विक्री अन्यथा साठवणूक हेच धोरण शेतकऱ्यांनी स्वीकारलेले आहे. त्यामुळे आवक कमी असताना प्रक्रिया उद्योजक आणि स्टॉकिस्ट हे अधिकच्या दराने खरेदी करीत आहेत. सध्या हमीभावाच्या बरोबरीने खुल्या बाजारात दर आहेत.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *