वातावरणात गारवा मात्र अवकाळीचा फटका पिकांना
काळ अवकाळी पडलेल्या पावसामुळे उकाड्यापासून सुटका होऊन चांगला गारवा जाणवला असला तरी शेतकरी संकटात सापडला आहे. अचानक झालेल्या पावसामुळे अनेक पिकांवर वाईट परिणाम झाला असून काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.
येत्या २ ते ३ दिवसात महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता दर्शवली होती. तर अनेक ठिकाणी मध्यरातीतून पाऊस पडला आहे.
पुढील दोन दिवस उत्तर महाराष्ट्रात ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार उत्तर महाराष्ट्रात काल मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला.
हे ही वाचा (Read This) कुक्कुटपालन,शेळीपालन,शेतमाल आदीसाठी ६०% अनुदान, ३१ मार्चपूर्वी असा करा अर्ज
पिकांचे नुकसान …
रात्री पडलेल्या पावसाने अनेकांना दिलास दिला परंतु शेतक-यांच्या पीकांना त्याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतक-यांच्या कांदा,गहू आणि द्राक्ष या पिकांना झालेल्या पावसाचा फटका बसला असल्याची अनेकांनी शंका व्यक्त केली आहे. कारण झालेल्या पावसामुळे आत्तापर्यंत अनेकांचे नुकसान झालेले पाहायला मिळते.
कोरोनाच्या काळातून आता कुठे शेतकरी सावरायला लागला होता. परंतु हवामान बदलाचा परिणाम पुन्हा शेतीवर झाल्याचे पाहायला मिळत आहे.
हे ही वाचा (Read This) आपलं शेती मध्ये कुठंतरी चुकतंय!
हवामान खात्याने वर्तवला होता अंदाज …
महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मध्य महाराष्ट्रात काल आणि आज गारपिटीची शक्यता असल्याचं देखील सांगण्यात आलं होतं.
मध्य भारतात पुर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा संगम होणार आहे त्यामुळे महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात,पश्चिम मध्य प्रदेश या ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात ताशी ४० कि.मी वेगानं वारं वाहण्याची शक्यता आहे असा हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार आजही अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असेल तर काही ठिकाणी पाऊस हजेरी लावणार आहे.
हे ही वाचा (Read This) जमिनीची कस म्हणजे तिचा कर्ब
ज्या द्राक्षबागा अंतिम टप्प्यात होत्या, अशा द्राक्ष बागांचे खूप मोठे नुकसान झाले. या अवकाळी आणि गारपिटीमुळे अंतिम टप्प्यात असलेल्या गव्हाच्या पिकाला मोठा फटका बसला असून कापून ठेवलेल्या हरभरा देखील निसर्गाच्या लहरीपणाचा शिकार झाला आहे.
हे ही वाचा (Read This) शेतीसाठी हे औषध एक उपाय अनेक !
सायखेडा करंजगाव चाटोरी व आजूबाजूच्या परिसरात काल झालेल्या गारपिटीमुळे परिसरातील मुख्य पीक द्राक्ष आणि कांदा समवेतच गव्हाचे मोठे नुकसान झाले आहे.
काल संध्याकाळी सात नंतर या परिसरात वादळी वारे आणि विजांचा कडकडाट सुरु झाला. त्यानंतर मात्र गारपीट झाल्याने सर्वात जास्त नुकसान रब्बी हंगामातील पिकांचे व द्राक्ष बागाचे झाले असल्याचे सांगितले जात आहे.