कांदा उत्पादकाच्या डोळ्यात पाणी, या निर्णयामुळे मिटणार का प्रश्न?

Shares

कांदा हे ऊस पिकानंतर दुसऱ्या क्रमांकाचे नगदी पीक आहे. यंदा कांद्याचे उत्पादन अधिक प्रमाणात झाले असले तरी कांद्यास अगदी कवडीमोलाचा दर मिळत आहे. कांद्याच्या ४० किलोच्या पोत्यास २०० ते २५० असा दर मिळत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आता मोठ्या संकटात सापडला आहे.

हे ही वाचा (Read This) ६० दिवसाच्या या पिकातून शेतकरी वर्षभर कमावू शकतात, जाणून घ्या संबंधित सर्व महत्त्वाच्या गोष्टी

कांद्याच्या लागवड खर्च्याच्या अगदी कवडीमोल दर कांद्यास मिळत आहे. लागवडी पासून विक्री पर्यंत शेतकऱ्यांनी इतकी मेहनत घेतल्यानंतर शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.
अनेक शेतकर्ती खरीप हंगामात कांद्याची लागवड करतात. जेणेकरून पुढच्या हंगामात चांगले उत्पन्न मिळेल आणि जमिनीचा पोत सुधारेल. त्यात आता लोशेडींग सुरु झाल्यामुळे कांद्याचे पीक शेतातच जाळून जात असून शेतकऱ्यांवर आता दुहेरी संकट आले आहे.

आजचे कांद्याचे दर

कांदा लागवडीला येतो असा खर्च ?

कांदा लागवड करण्यासाठी साधरणतः २० हजार रुपये खर्च येतो. रासायनिक खतांचा खर्च १० हजार रुपये, औषधासाठी सहा ते सात हजार रुपये व कांदा काढणीसाठीचा खर्च मिळून एकरी ४० ते ४५ हजार रुपये लागतात. कांदा लावण्यासाठी मजुरी एकरी पाच हजार रुपये लागतात ते वेगळे.

हे ही वाचा (Read Thisबदक पालनातून शेतकऱ्यांना मिळणार अतिरिक्त उत्पन्न, कोंबड्यांपालना पेक्षा सोपे आहे

शेतकरी आणि बाजार समिती प्रशासन संवाद

कांद्यास किमान दर तरी मिळावा म्हणून कांदा उत्पादक संघटनेकडून लोक चळवळ उभी केली जाते आहे. लासलगाव मधील कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा साठी आशिया खंडातील पहिल्या नंबर वरची बाजार समिती आहे. त्यामुळे कांद्यास किमान दर तरी मिळावा यासाठी महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भेट देऊन व्यापारी, समिती प्रशासन, शेतकरी यांच्यासोबत संवाद साधला.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *