इतर बातम्या

उन्हाळी सोयाबीन शेतकऱ्यांना तारणार की धोका देणार ? एकदा वाचाच

Shares

सध्या सोयाबीनला बाजारात चांगला भाव मिळत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशी उपटून सोयाबीनची लागवड केली आहे. हवामान बदलामुळे या पिकाला पाहिजे तशी फुले येत नसल्यामुळे शेतकऱ्याच्या चिंतेत भर पडली आहे.

शेतकऱ्यांच्या उत्पनात वाढ व्हावी तसेच खरिपात त्यांना बियाण्याची कमतरता भासू नये यासाठी उन्हाळी सोयाबीनची मोठ्याप्रमाणात लागवड व्हावी म्हणून कृषी विभागाला विशेष लक्ष देण्यासाठी पालकमंत्र्यांनी सूचना दिल्या होत्या.

जिल्ह्यातील ८ तालुक्यांपैकी ६ तालुक्यामध्ये ४४९ हेक्टर वर उन्हाळी सोयाबीनची लागवड झाली आहे. किमान ९०९ हेक्टर सोयाबीनची लागवड होईल अशी अपेक्षा कृषी विभागला होती. मात्र सोयाबीन पिकाला पाहिजे तशी फुलेच येत नसल्याने शेतकऱ्यांना चिंता होत आहे.

पाहिजे तशी फुले येत नाहीये..

सध्या ४४९ हेक्टर शेतजमिनीवर उन्हाळी सोयाबीन पिकाचा पेरा झाला आहे. असे असले तरी आठही तालुक्यात या पिकाला पाहिजे त्या प्रमाणात फुले येत नसल्याची तक्रार सध्या शेतकरी करीत आहेत.

२०२१ मध्ये खरीप हंगामात जिल्ह्यात १७ हजार ८६० शेतकऱ्यांनी १ लाख २९ हजार ५२८ हेक्टरवर सोयाबीन पिकाची लागवड केली होती. यंदा किमान ९०९ हेक्टरवर उन्हाळी सोयाबीनची लागवड होण्याची अपेक्षा कृषी विभागाला होती. प्रत्यक्षात जिल्ह्यातील आठही तालुक्यात ४४९ हेक्टरवर उन्हाळी सोयाबीनचा पेरा झाला आहे.

हे ही वाचा (Read This) नाबार्ड डेअरी योजना, ५० टक्के अनुदान

ढगाळ वातावरणाचा परिणाम ..

खरीप हंगामात निसर्गाने वेगळाच खेळ मांडून ठेवला होता. आता उन्हाळ्यात ढगाळ वातावरण निर्माण होत असल्यामुळे निसर्ग पुन्हा काही नवीन खेळ खेळतो की काय याची भीती शेतकऱ्यांना आहे.

शेतकऱ्यांनी या पिकाचे व्यवस्थापन उत्तम व योग्य पद्धतीने करावे. शिवाय इमामेकटीन या औषधाची फवारणी पिकावर करावी. त्यामुळे फुले येण्यास सुरुवात होईल. असे कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

ही वाचा (Read This) या कीटकनाशकांवर बंदी, पिकांसह मानवी आरोग्यावर होत होता वाईट परिणाम

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *