खतांच्या दरवाढीचा उत्पादनावर परिणाम ?
यंदा शेतकऱ्यांना सर्वच संकटांचा सामना करावा लागत आहे. सर्वात पहिले नैसर्गिक संकट त्यानंतर आता आर्थिक संकट. खतांमध्ये पोटॅश हे महत्वाचे असून पोटॅशची आयात ही रशिया आणि बेलारूस वरून मोठ्या प्रमाणात केली जाते.
जमिनीची सुपीकता टिकून राहावी तसेच चांगले उत्पादन मिळावे यासाठी शेतकरी खतांचा वापर करत असतो. मात्र आता शेतकऱ्यांना खतांसाठी अधिकची किंमत मोजावी लागणार आहे.
भारत सरकारला आता नव्या पर्यांयांचा शोध घेतल्याशिवाय दुसरा मार्गच नाही. खरिपातील खताचा प्रश्न मिटवण्यासाठी आतापासूनच खताची आयात केली तरच गरज भागणार आहे. अन्यथा याचा परिणाम थेट उत्पादनावर होणार आहे.
आधीच खाद्यतेल, गॅस, भाजीपाला यांच्या किमतींमध्ये वाढ जाहली आहे. आता त्यात खतांमध्ये देखील वाढ होणार आहे
भारतामध्ये खतांची आयात
देशात खतनिर्मितीचे प्रमाण खूपच कमी आहे. यासाठी आवश्यक असलेल्या कच्च्या माल देखील आयात करावा लागत आहे. शिवाय कच्चा माल उपलब्ध नसल्याने मध्यंतरीच खताच्या दरात वाढ झाली होती.
हे ही वाचा (Read This) प्रधान मंत्री मोफत सोलार पॅनल योजना २०२२, योजनेसाठी असा करा अर्ज
देशाच्या एकूण खत आयातीपैकी रशिया, बेलारुस आणि युक्रेन या तीन देशातून 20 टक्क्यांपर्यंत खत आयात होते. दरवर्षी ७० लाख टन डीएपी, ५० लाख टन पोटॅशची आयात केली जाते. यापाठोपाठ कॅनडामध्ये पोटॅशचे उत्पादन होते. मात्र, येथील उत्पादनही वाढेल असे सध्याचे चित्र आहे.
त्यामुळे खत निर्मितीमधील अडचणी आणि आयातीवर होणारा परिणाम या बाबी यंदा नुकसानीच्या ठरणार आहेत. शिवाय खताचा पुरवठा झाला तरी दरात मात्र, दुपटीने वाढ होणार असल्याचे खते विक्रेत्ये उत्तम अग्रो यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा (Read This) या पिकाची लागवड करून ९० ते १०० दिवसांमध्ये व्हा मालामाल
खतांच्या दरात वाढ होणे निश्चित
कठीण परस्थितीमध्ये खतांची आयात झाली तरी दरवाढीतून सुटका नाही. गतवर्षीच कच्च्या मालाचा पुरवठा होत नसल्यामुळे खतांच्या दरात वाढ झाली होती. शिवाय अगोदर देशांतर्गतची गरज आणि नंतरच निर्यात असेच धोरण सर्व देशांनी केले आहे.
चीनने निर्यातच थांबवली होती तर अन्य देशांनी निर्बंध लादलेले आहेत. खतांची आयात झाल्यानंतर देखील दरात वाढ होणे हे निश्चित आहे.