हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सरकारने घेतला हा निर्णय
यंदा शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला असून त्यात नैसर्गिक संकटाबरोबर आर्थिक संकटाचा देखील सामना करावा लागत आहे. सततच्या शेतमालाच्या किमतीत होणाऱ्या चढ उतारामुळे शेतकरी (Farmers) त्रस्त झालेला आहे. सोयाबीन, कापूस , कांद्यासह हरभऱ्याच्या किंमतीत (Harbhara Rate) देखील आता बदल होतांना दिसत आहे. त्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमी भावाने हरभऱ्याची खरेदी होत नव्हती. त्यामुळे आता राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे.
आता हरभरा हमीभावाने विकता येणार असून हरभऱ्यास (Chickpea) ५ हजार २५० हा हमीभाव ठरवण्यात आला आहे. शेतकऱ्यांना आता विक्री करण्यासाठी त्यांना १५ मार्च पर्यंत नोंदणी करावी लागणार असून त्यानंतर प्रत्येक्षात विक्री करता येणार आहे.
हे ही वाचा ( Read This) राज्यात बर्ड फ्ल्यू चा शिरकाव, शेकडो कोंबड्यां मृत्युमुखी
खुल्या बाजारात दर घसरले तरी शेतकऱ्यांकडे पर्याय
रब्बी हंगामातील पिकांची आता आवक सुरु झाली असून खुल्या बाजारपेठेत (Market) हरभऱ्यास ४ हजार ७०० असा दर असला तरी हमीभाव हा ५ हजार २५० रुपये क्विंटल ठरवला आहे. मात्र खरेदी केंद्र उभारलेली नसल्यामुळे शेतकऱ्यांना याच भावात हरभरा विक्री करावी लागत आहे. आता त्वरित हरभरा हमीभाव केंद्र सुरु करण्याची मागणी शेतकरी करत असल्यामुळे आता खुल्या बाजारात दर घसरला तरी देखील शेतकऱ्यांकडे हमीभाव केंद्राचा पर्याय असणार आहे.
हे ही वाचा ( Read This) माती चे शोषण नाही पोषण करा….
नोंदणीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे
हरभरा विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ येथे आधार कार्ड, सातबारा, ८ अ उतारा, तलाठ्यांच्या स्वाक्षरीचा पीक पेरा उतारा किंवा हरभरा पिकाच्या नोंद असलेला सातबारा, आधार लिंक असलेले बँक पासबुकची झेरॉक्स ही कागदपत्रे जमा करावी लागणार असून केंद्राच्या किमान हमीभावानुसार शेतीमाल खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पणन महासंघ, मुंबई, दि विदर्भ सहकारी पणन महासंघ, नागपूर, महाएफपीसी पुणे, पृथ्वाशक्ती फार्मर प्रड्युसर कंपनी, नगर आदींच्या माध्यमातून हरभऱ्याची खरेदी केली जाणार आहे.