इतर बातम्याबाजार भाव

सोयाबीन दरात वाढ, ७ हजारांच्या दिशेने !

Shares

खरीप हंगामात सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली होती. त्यामुळे सर्वकाही बाजारपेठेच्या दरावर अवलंबून होते. सुरुवातीपासूनच सोयाबीनच्या दरात सतत चढ उतार होत असतानाचे चित्र आपल्याला बघायला मिळाले. शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीपेक्षा सोयाबीन साठवणुकीवर जास्त भर दिला होता. त्यामुळे सोयाबीनच्या दरात थोडी वाढ झाली होती मात्र त्यानंतर पुन्हा सोयाबीनचे दर घसरले होते.आता सोयाबीनच्या अंतिम टप्यात असून साठवणुकीचा फायदा आता सोयाबीन शेतकऱ्यांना होतांना दिसत आहे.

ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने सरकारचे हे ५ महत्वाचे उद्धेश्य

सोयाबीनच्या दरात वाढ झाल्यामुळे शेतकरी सुखावला

सुरवातीपासून सोयाबीनच्या दरात सतत चढ उतार होतांना आपण पहिले आहे. दिवाळीच्या पूर्वी सोयाबीनला ४ हजार ५०० असा दर होता.त्यानंतर हा दर ६ हजार ५०० वर आला मग आता हा दर ६ हजार ८०० वर आला आहे. सोयाबीनच्या दरात वाढ व्हावी यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली होती. तर टप्याटप्याने त्याची आवक सुरु केली होती. शेतकऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाचा त्यांना चांगला फायदा झाला आहे. मागील ५ दिवसापासून सोयाबीनच्या दरात वाढ होतांना दिसून येत आहे. या वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही वाचा (Read This ) शेळीपालन आणि कुक्कुटपालन साठी मिळणार 50 लाख रुपये अनुदान

शेतकऱ्यांचा निर्णय ठरला फायद्याचा
काही काळ वगळता यंदा वगळता सोयाबीनच्या दरात कायम घटच झालेली आहे. त्यामुळे साठवणुकीवर शेतकऱ्यांनी भर दिलेला होता. आता दर वाढल्यानंतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीला बाजार समितीत आणायला सुरुवात केली आहे. सोयाबीनच्या आवक मध्ये वाढ होईल असा अंदाज सुरुवातीपासूनच होता. मात्र दराच्या बाबतीत सर्वांनाच शंका होती.मात्र आता मागील ६ दिवसापासून सोयाबीनच्या दरात वाढ झालेली दिसून येत आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *