मिरचीला मिळतोय रेकॉर्ड ब्रेक दर, मात्र शेतकऱ्यांचा फायदा नाही
नंदुरबार बाजार समितीमध्ये लाल मिरचीला रेकॉर्ड ब्रेक दर मिळत असून लाल मिरचीला ८००० रुपये प्रति क्विंटल तर वाळलेल्या मिरचीला १७५०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. मात्र मिरचीच्या दरात वाढ होऊन जास्त फायदा नाही कारण उत्पादनात मोठी घट झाली असून अतिशय कमी उत्पादन मिळाले आहे.
नंदुरबार बाजार समितीमध्ये अनेक जिल्ह्यातून मिरची विक्रिसाठी येते. मात्र यंदाचे बाजारपेठेतील चित्र हे वेगळे आहे. भविष्यात जर उत्पादनात अजून घट झाली तर दरात अजून वाढ होण्याची शक्यता आहे.
ही वाचा (Read This ) एका कॉल वर शेतकऱ्याचे प्रॉब्लेम होणार सॉल्व्ह, किसान कॉल सेंटर
दर वाढूनही शेतकऱ्यांना जास्त फायदा नाही
मिरचीला रेकॉर्ड ब्रेक भाव मिळत असला तरी शेतकऱ्यांना त्याचा काहीसा फायदा होतांना दिसत नाहीये. कारण मिरचीचे उत्पादन हे अगदी कमी प्रमाणात झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे आता जास्त शेतमाल उपलब्ध नाही. लाल मिरची बरोबर वाळलेल्या मिरची देखील आवक सुरु झाली आहे. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादनात घट झाली आहे.
ही वाचा (Read This ) पीएम किसान ट्रॅक्टर योजना २०२२, मिळणार ५० टक्के अनुदान
१ लाख ६५ हजार क्विंटल मिरची बाजारात पोचली
नंदुरबारमध्ये मिरचीची मुख्य बाजारपेठ असून इतर राज्यातून नंदुरबारमध्ये मिरची विक्रीकरण्यात येते. तसेच लाल मिरचीची तोडणी केल्यानंतर लवकरात लवकर तिची विक्री करावी लागते. यंदा आता पर्यंत १ लाख ६५ हजार क्विंटल पेक्षा अधिक मिरचीची आवक झाली आहे. सध्या मिरचीची चांगली आवक होत आहे मात्र भविष्यात मिरचीच्या उत्पादनावर अधिक परिणाम होणार आहे त्यामुळे भविष्यात किती प्रमाणात आवक होईल हे सांगता येणार नाही.
ही वाचा (Read This ) पशुपालन करणाऱ्यांना सरकार यासाठी देणार ७५ टक्के अनुदान