कांद्याची आवक वाढूनही दर चढेच, यंदा मिळत आहे जास्त भाव
बाजारात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र अवकाळी पडलेल्या पावसामुळे कांदा उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. बाजारात कांद्याची आवक होत असली तरी बहुतांश कांदा हा पावसामुळे खराब झाला आहे. त्यामुळे दर्जात्मक कांदा बाजारात देखल होईपर्यंत कांद्याचे दर चढे राहतील असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
ही वाचा (Read This ) या राज्यात लाल मिरचीचा ठसका, भाव २५ हजार पार
सध्या कांद्याला २० ते ३० रुपये प्रति किलो दर मिळत आहे. नवीन कांद्याच्या ऐन हंगामात पाऊस पडला होता त्यामुळे कांद्याला गरजेपेक्षा जास्त पाणी पुरवठा झाला असून ओलसर कांदा बाजारात विक्रीस आला आहे. हा ओलसर कांदा फक्त एकच दिवस टिकू शकेल असा आहे. त्यामुळे बाजारात चांगल्या दर्जाच्या कांद्यास जास्त प्रमाणात मागणी होत आहे.
अगदी तोडणीला आलेल्या कांदयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे अनेक शेतकरी चिंतेत आहेत. दरवर्षी या काळामध्ये कांद्याचे दर हे १० रुपये प्रति किलो प्रमाणे असतात मात्र यंदा कांद्यास २० ते ३० रुपये प्रति किलो दर मिळत असून कांद्याचा हा दर अजूनही स्थिर आहे.
ही वाचा (Read This ) राष्ट्रीय गाय पालन योजना 2022, असा करा अर्ज