इतर बातम्या

अबब ! शेतकऱ्याने बांधली दीड एकराची विहीर, खर्च २ कोटी

Shares

बदलते वातावरण, सततचा दुष्काळ तसेच अतिवृष्टी यामुळे शेतकरी अनेक संकटांचा सामना करत आहेत. बीड जिल्ह्यात तर नेहमी दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे बीड मधील एका शेतकऱ्याने दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी एक अजब गजब विहीर बांधली आहे. त्याने दीड एकर क्षेत्रात जवळ जवळ २ कोटी रुपये खर्च करून ही विहीर बनवली आहे. या विहिरीमुळे ३ ते ४ वर्ष जरी पाऊस पडला नाही तरीही तो ५० एकरवर बागायती शेती करू शकतो. ही विहीर महाराष्ट्रातील दुष्काळी जिल्ह्यातील सर्वात मोठी विहीर म्हणून नोंद होईल का हे पाहण्यासारखे आहे.

ही वाचा (Read This ) डाळिंबला मिळतोय सफरचंदपेक्षा जास्त भाव !

अखेर विहीर बांधण्याचे ठरवले …
बीडमधील गेवराई तालुक्यामधील पाडळसिंगी मारोती बजगुडे या शेतकऱ्याने दीड एकर शेतामध्ये विहीर बनवली आहे. या शेतकऱ्याकडे १२ एकर शेती असून सतत दुष्काळी परिस्थितीमुळे त्यास अनेक संकटांचा सामना करावा लागत असे त्यातील सर्वात मोठी समस्या पाण्याची होती. पाण्याच्या अभावामुळे उत्पन्नात सतत घट होत असल्यामुळे बाराहीमहीने पाणी पुरावे यासाठी काही उपाययोजना करण्याचा विचार ते करत होते. सर्वात मोठी समस्या पाण्याची असल्यामुळे जास्तीत जास्त पाणीसाठा कसा करता येईल असा प्रश्न पडला असता त्यांनी तब्बल दीड एकर शेतामध्ये विहीर बांधली आहे. आता ते ३ ते ४ वर्षे अगदी सहज शेती करू शकतात.

हे ही वाचा (Read This ) शेतकरी मित्रांनो, SHCS या योजनेचा आपण लाभ घेतला आहे का ?

अनेक अडचणींवर मात करून बांधली ही विहीर
सुरुवातीस त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला असून त्यांनी ही विहीर खोदण्यासाठी ३ वर्षांपूर्वी सुरुवात केली होती. विहीर खोदताना निघालेला मुरूम त्यांनी महामार्गासाठी दिला असून त्यांना त्यातून १५ ते २० लाख रुपये मिळाले. खोदकाम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी साडेपाच परस खोलवरून सिमेंटने सर्व बाजूस कडे टाकले.मागील ६ महिन्यापासून ८० मजूर दररोज काम करत असून १० हायवा यामधील माती तसेच दगड काढण्यासाठी लावण्यात आल्या होत्या. अनेक अडचणींवर मात करून त्यांनी ही विहीर पूर्ण केली.

हे ही वाचा (Read This ) रासायनिक, जैविक, सेंद्रिय, शेतीचे अनेक प्रयोग ऐकले पण आता होमिओपॅथिक शेती

विहीर बघण्यासाठी नागरिकांनी केली गर्दी
तब्बल दीड एकरात २ कोटीची विहीर बांधल्याची माहिती मिळताच अनेकांनी ती विहीर बघण्यासाठी गर्दी केली आहे. या विधीमध्ये १० कोटी लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. या विहिरीची महाराष्ट्रातील पहिली सर्वात मोठी विहीर म्हणून नोंद होण्याची शकता आहे. या विहिरीमुळे आता मारुती बजगुडे यांचा सर्वात मोठा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांना दरमहा ३ हजार रुपये पेन्शन मिळणार, असा करा अर्ज

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *