रासायनिक, जैविक, सेंद्रिय, शेतीचे अनेक प्रयोग ऐकले पण आता होमिओपॅथिक शेती

Shares

बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रात महाराष्ट्रातील (Maharashtra) पहिला आगळावेगळा प्रयोग (Experiment) करण्यात आला आहे. चक्क होमिओपॅथीची औषधे वापरून शेतीचा एक अनोखा प्रयोग करण्यात आला आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर वाचत आहात. होमिओपॅथी औषधांचा वापर हा शेतीसाठी केला जात आहे. कृषी विज्ञान केंद्रात स्कॉच बोनेट नावाच्या मिरचीच्या वाणाची लागवड करण्यात आली असून या संपूर्ण मिरचीवर होमिओपॅथी औषधांचा वापर करून वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील हा सर्वात प्रयोग असून या मिरचीला तिखट मिरची म्हणून ओळखले जाते मात्र या प्रयोगानंतर ही मिरची तिखट नाही तर चवीला थोडी गोड लागते. रासायनिक खतांच्या तुलनेत या होमिओपॅथी औषधांच्या फवारणीचा खर्च हा ३ पटीने कमी आहे.

हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांना दरमहा ३ हजार रुपये पेन्शन मिळणार, असा करा अर्ज

होमिओपॅथीच्या औषधांची केली फवारणी
आजवर आपण शेतामध्ये जैविक (organic farming) , रासायनिक (chemical organic) , सेंद्रिय पदार्थांची फवारणी केलेली पहिली असेल. आता मात्र चक्क होमिओपॅथीच्या औषधांची (homeopathic farming) फवारणी करून पीक घेतले जात आहे. होमिओपॅथीची औषधे फवारणीचा प्रयोग हा बारामतीमध्ये यशस्वी ठरला आहे. कर्नाटकातील होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ. वीरेंद्र पाटील यांच्या संशोधित होमिओपॅथिक औषधी उपचार पद्धतीतून हे मिरचीचं पीक घेण्यात आले असून सर्वच पिकांवर याचा वापर करता येतो असे त्यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा (Read This ) आता सातबारा उतारा बंद? राज्य सरकारचा निर्णय

काय घेतली काळजी ?
कृषी विज्ञान केंद्रात ही विविध रंगाची मिरची सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसून येत आहे. त्यातही अत्यंत कमी खर्चात ही मिरची (Chilly) उत्पादित करण्यात आले आहे. तसेच पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून त्यावर नायलॉन पेपर टाकण्यात आलाय. शेडनेट किंवा पॉलिहाऊस पेक्षा खूप कमी खर्च लागतो.

हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांनो हा व्यवसाय करून महिन्याला कमवा लाखों रुपये

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *