शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कापसाच्या दराने गाठले आकाश
कापसाला सध्या मिळलेल्या दरामुळे शेतकरी सुखावला आहे. बाजार समितीमध्ये कापसाला चांगला भाव मिळाला आहे. तसेच कापूस (Cotton) खरेदी केंद्रावर गर्दी दिसू लागली आहे. कापसाच्या दरात आता अजून वाढ होण्याची शक्यता दिसून येत आहे. सुरवातीला कापसाचे दर चांगले होते. नंतर या दरात घसरण होऊन हे दर थेट ७ हजारावर येऊन थांबले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस साठवणुकीवर भर दिला होता. आता मात्र बाजार समितीमध्ये कापसाला ९ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. आता या दरात अजून वाढ होऊन सध्या दर ९ हजार ७०५ रुपये झाला आहे. त्यामुळे कापसाला पांढरे सोने असे संबोधले जात आहे.
भाववाढीचे सर्व श्रेय शेतकऱ्यांना …
गेल्या आठवड्यापासून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील आठवड्यापासून लिलाव सुरु होता. तेव्हा कापसाला ८ हजार २०० ते ८ हजार ५०० असा दर मिळत होता त्यानंतर या लिलावामध्ये कापसाला ९ हजाराच्या पुढे दर मिळाला असता या दारात आणखीन वाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. आता कापसाला चक्क ९ हजार ७०० पर्यंतचा भाव मिळत आहे.याचे कारण म्हणजे शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा अभ्यास करून सावधपणे कापसाचे निर्णय घेतले. सुरवातीपासूनच शेतकऱ्यांनी कापूस टप्याटप्याने विक्रीस काढले होते.
हे ही वाचा (Read This) युरिया ऐवजी गोमुत्राचा या पद्धतीने करा वापर, मिळवा भरघोस उत्पन्न.
कापसाच्या विक्रीत वाढ …
सुरवातीला कापसाला मुबलक असा भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक केली असून टप्याटप्याने त्यांनी कापूस विक्रीसाठी काढला होता. मात्र आता कापसाला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी हळूहळू जास्त संख्येने कापूस विक्रीसाठी काढत आहेत. कापसाचा भाव हा ९ हजार ७०० पर्यंत पोचला आहे तर लवकरच हा भाव १० हजार गाठेल असे म्हणण्यास हरकत नाही.