या राज्यातील कांद्याने शेतकऱ्यांना रडवले, कांदा १ रुपये किलो
शेतकरी (Farmer) सतत एकालागोपाठ अनेक संकंटांचा सामना करत असून त्यात आता कांदाच्या दराने शेतकऱ्यांना रडवले आहे. गेल्या काही दिवसांपासून रतलाम कृषी (Agriculture ) उत्पन्न बाजारामध्ये कांद्याची चांगलीच आवक होत आहे. मात्र कांद्यास मुबलक दर मिळत नसल्याने अगदीच कवडीमोल भावात शेतकऱ्यांना कांदा विक्री करावी लागत असून अनेक शेतकरी पिकांची विक्री न करता माल तसाच बाजारात सोडून जात आहे. मागच्या आठवड्यात रतलाम कृषी उत्पन्न बाजारामध्ये २०० ट्रॉली पेक्षा जास्त आवक होत होती. आता कांदा (Onion) १०० रुपये प्रति क्विंटलने विकला जात आहे.
हे ही वाचा (Read This Also ) नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजात १% ते ३% सवलत.
बाजारात शेतकरी १ रुपये किलोने कांदा विक्री करत असून २ ते ३ दिवस कांद्याची विक्री न झाल्यामुळे कांदा बाजार समितीमध्ये अनेक शेतकरी कांदा तसाच सोडून जात आहे. याचा फायदा अनेक व्यापारी घेत आहेत. अवकाळीमुळे अनेक पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना व्यापारी सांगतील त्या भावात शेतमाल विक्री करावा लागत असून कांदयाची आवक वाढूनही दर कमी मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा आहे. सध्या कांद्याला भोपाळमध्ये ३० रुपये किलो तर जबलपूरमध्ये ४५ रुपये प्रति किलो दर मिळत आहे.