फलोत्पादन

फळबागांचे लाखोंचे नुकसान, मदत नाममात्र

Shares

अतिवृष्टी , अवकाळी (Untimely Rain ) मुळे पिकांचे मोठ्या संख्येने नुकसान झाले आहे. पिकांचे नुकसान झाल्याबरोबर कृषीमंत्रीने त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. वेळ पडल्यास कागदावर नोंदणी करून घ्या परंतु पंचनामा करण्यास विलंब करू नका अश्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यांनतर इंदापूर तालुक्यातील फळबागांना वेळीच आर्थिक मदत (Financial Help ) मिळाली. मात्र नुकसानीच्या तुलनेत अगदीच कमी भरपाई रकम शेतकऱ्यांना मिळाली आहे. फळबाग लागवडीपासून जोपासणीपर्यंत हेक्टरी लाखोंचा खर्च झाला तर नुकसान भरपाई म्हणून केवळ १८ हजार रुपये देण्यात आलेले आहेत. ज्या जिल्ह्यातून अहवाल सादर होईल त्यांना मदत केली जात आहे. पण नुकसानीच्या तुलनेत होत असलेली मदत ही नाममात्र असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे.

हे ही वाचा (Read This Also ) एका एकरात चक्क १५ लाखांचे उत्पन्न !

पंचनामा अहवाल…
पीक काढणीला असतांना अवकाळी पाऊस पडला होता. त्यामुळे फळबागांचे अधिक नुकसान झाले होते. फळबागांपैकी आंबा, द्राक्षाचे जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे. आदेशानुसार यांचे लवकर पंचनामे करण्यात आले असून सांगली, नाशिक, इंद्रापुर , पुणे येथील नुकसानीचे अहवाल कृषी विभागाकडे सादर करण्यात आले होते. यात सोलापूर जिल्ह्याचे पंचनामे करण्याबाबतचे आदेश विभागाला मिळाले नसल्यामुळे अनेक शेतकरी सहाय्यतेच्या प्रतीक्षेत आहेत.

नुकसान भरपाईचे स्वरूप …
नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी आणि डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम फळबागांवर तर झालाच होता पण काही भागांमध्ये तर रब्बीची दुबार पेरणी करावी लागली होती. असे असताना आता द्राक्षबागांच्या नुकासानीपोटी हेक्टरी १८ हजार रुपये मदत करण्यात आली आहे. इंदापूर तालुक्यातील ६१ गावांमधील ८२५ द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे ८१५ हेक्टरावरील द्राक्षाचे नुकसान झाले होते.७४ लाख ७३ हजार रुपये तालुक्यास मिळालेले आहे, असे कृषी अधिकारणी रुपनकर यांनी सांगितले.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *