कापसाला रेकॉर्डब्रेक 9000 हजार रुपये भाव !
सतत कापसाच्या दरात घसरण होत होती त्यामुळे शेतकरी संकटात सापडला होता. मात्र आता कापसाला सध्या मिळलेल्या दरामुळे शेतकरी सुखावला आहे. बाजार समितीमध्ये कापसाला चांगला भाव मिळाला आहे. सुरवातीला कापसाचे दर हे थोडे चांगले होते. नंतर या दरात घसरण होऊन हे दर थेट ७ हजारावर येऊन थांबले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस साठवणुकीवर भर दिला होता. आता मात्र नंदुरबारबाजार समितीमध्ये कापसाला ९ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.कापसाला मिळालेला हा दर उचांक दर आहे असे सांगिलते जात आहे. यंदा सीसीआय ने कापूस खरेदी नाही करणार असे सांगितले होते त्यामुळे बाजार समितीने परवानाधारक व्यापाऱ्यांना कापूस खरेदीसाठी बाजारात आमंत्रण दिले होते.
कापसाला बाजारात प्रथमच एवढा चांगला भाव मिळत असून पुढे या दरात अजून तेजी येण्याची शक्यता आहे. प्रारंभीपासूनच कापसाचे दर हे चढे असल्याने पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल सात हजार ३०० रुपयांचा दर देण्यात आला होता. दिवाळीनंतर या दरात वाढ होऊन प्रतिक्विंटल आठ हजार रुपयांवर पोहोचले होते. दरम्यान, सोमवारी या दरांनी अचानक उसळी घेतल्याने ९ हजार १ रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस खरेदी करण्यात आली आहे. बाजारात कापसाला आजअखेरीस सात हजार ५०० ते ९ हजार १रुपये प्रतिक्विंटल दर देण्यात आल्याची माहिती आहे. या दरांमुळे शेतकन्यांमध्ये आनंदोत्सव साजरा होत आहे. समितीच्या कापूस खरेदी केंद्रावर वाहनाच्या रांगा दिसू लागल्या आहेत.कापसाच्या दरात तेजी कायम राहण्याचा अंदाज बाजार समितीने दिला आहे.