गावासाठी मिळालेला सरकारी निधी कुठे,कसा खर्च केला जातो ?
सरकाने गावाच्या विकासासाठी निधी मंजूर केला आहे असे तुम्ही अनेकदा ऐकले किंवा वाचले असेल. परंतु निधी नेमका का मिळतो? आलेल्या निधीमधील किती टक्के खर्च ग्रामपंचायत करते? गावाच्या विकासाठी निधी मिळतो का ? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडत असतील. याच सर्व प्रश्नांची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
गावाचं बजेट कसे ठरते ?
१. ग्रामविकास समितीची बैठक दरवर्षी ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यात होत असते.
२. या बैठकीमध्ये गावाचे आरोग्य, महिला कल्याण, शिक्षण आदी आवश्यक बाबींवर चर्चा केली जाते.
३. याचबरोबर गावाकडे किती निधी उपलब्ध आहे तसेच सरकारकडून किती निधीची अपेक्षा आहे याचे एक पत्रक तयार केले जाते.
४. गावातील सर्व योजनेचं अंदाजपत्र एकत्रितपणे ३१ डिसेंबरपूर्वी पंचायत समितीस पाठवणे गरजेचे असते.
५. हे पाठवले अंदाजपत्र पंचायत समिती राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येते.
६. केंद्र,राज्य तसेच इतर योजना मिळून साधारणतः एका गावात ११४० योजना राबवल्या जातात.
७. या योजण्यांपैकी कोणत्या गावात कोणती योजना दयावी हे निर्णय कोणत्या जिल्ह्यात हे गाव आहे तसेच हे गाव कोणत्या भौगोलिक क्षेत्रात येते यावर अवलंबून असते.
८. जर राज्य सरकारची योजना असेल तर १०० टक्के निधी राज्य सरकार देते.
९. केंद्र सरकारच्या अनेक योजनेमध्ये ६० टक्के केंद्र सरकार तर ४० टक्के राज्य सरकार निधी देते.
१०. १ एप्रिल २०२० पासून सुरु झालेल्या १५ व्या वित्त आयोगानुसार सरकार गावातील प्रति माणूस प्रमाणे प्रति वर्षी ९५७ रुपये देत आहे.
११. चौदाव्या वित्त आयोगाने गावासाठी दिलेल्या रुपयांपैकी २५% मानवविकास, २५% कौशल्य विकास, २५% पायाभूत विकास , २५% केंद्र, राज्य सरकारचा समन्वय खर्च सरकारने करण्यास सांगितले आहे.
१२. परंतु आता मात्र पंधराव्या वित्त आयोगांतर्गत गावाला मिळालेल्या निधीपैकी ५० ५ निधी हा पाणीपुरवठा, स्वछता इत्यादी बाबींवर खर्च करण्यास सांगितलेले असून उरलेले ५०% इतर बाबींसाठी सांगितले आहे.
गावासाठी आलेला निधी ग्रामपंचायतीने कुठे केला खर्च कसे कळेल ?
१. तुम्हाला जर गावासाठी आलेल्या निधीची माहिती जाणून घ्यायची असेल तर ई-ग्राम स्वराज्य नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल.
२. या अँप्लिकशन वर तुम्हाला ग्रामपंचायतीच्या सर्व विकासकामाची माहिती मिळेल.
३. ग्रामपंचायतीसाठी किती निधी मंजूर केला , त्या निधीचा कुठे वापर झाला याची देखील संपूर्ण माहिती तुम्हाला या अँप्लिकेशन वर मिळेल
४. गावातील कुठलाही माणूस अगदी सहजपणे आपल्या गावात काय काम सुरु आहे कोणते काम कुठपर्यंत आले याची सर्व माहिती आपल्या मोबाईल वर पाहू शकतो.
गावाची संपूर्ण माहिती मोबाईलवर कशी पाहावी ?
१. गावासाठी आलेल्या निधीची तसेच विकासकामांची माहिती मोबाईलवर जाणून घेण्यासाठी तुम्हाला ई-ग्राम स्वराज नावाचे आप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल.
२. हे अँप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर समोर एक पेज उघडेल त्यावर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा , ब्लॉक पंचायत मधील तालुका, गावाचे नाव यांची निवड करायची आहे.
३. सर्व माहिती निवडल्यावर तुम्हाला तिथे दिलेल्या सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे.
४. त्यानंतर दुसरे पेज उघडेल त्या पेज वर तुम्ही भरलेली माहिती दिसेल म्हणजेच तुम्ही निवडलेले गाव , राज्य , तालुकाचे नाव दिसेल. त्याच्याच समोर तुमच्या गावाचा कोड नंबर दिसेल.
५. तुम्हाला ज्या वर्षाची माहिती जाणून घ्यायची आहे त्या वर्षाची निवड करावी.
६. नंतर तुमच्या समोर ३ पर्याय दिसेल. ते ३ पर्याय कोणते हे आपण पाहू .
पहिला पर्याय – ER Details – हा पर्याय निवडून आलेल्या ग्रामपंचायत समितीच्या सदस्यांची माहिती जाणून घेता येते. या पर्यायावर क्लिक केल्यास तुम्हाला गावातील सचिव, सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांची नावे, वय, पद, जन्मतारीख अशी संपूर्ण माहिती मिळते.
दुसरा पर्याय – Approved Activity – हा पर्याय निवडून ग्रामपंचायतीसाठी कोणत्या कामासाठी किती निधी मंजूर करण्यात आला आहे याची संपूर्ण माहिती जाणून घेता येते.
तिसरा पर्याय – Financial Progress – हा पर्याय निवडून तुम्हाला गावाच्या आर्थिक प्रगतीची माहिती मिळवता येते. तुम्ही या पर्यायावर क्लिक केल्यास एक नवीन पेज ओपन होईल. त्यावर तुम्हाला वर्ष निवडून गावाचे नाव व कोड दिसेल त्यानंतर तुमच्या गावासाठी किती निधी देण्यात आला आहे, किती खर्च झाला आहे याची माहिती मिळते.
७. खाली एक list of scheme नावाचा पर्याय असेल त्यावर क्लिक केल्यास निधीची विभागणी कशी केली गेली आहे याची माहिती मिळेल. तसेच किती निधी खर्च झाला आहे हे देखील कळेल.
आलेल्या निधीचा वापर केला नाही तर ?
जर गावासाठी आलेल्या निधीचा वापर केला गेला नाही तर तो निधी सरकारकडे वापस जातो. तसेच त्या निधीचा वापर केला नाही म्हणजेच त्याचा अर्थ ग्रामपंचायत गावाचा बरोबर योग्य पद्धतीने आराखडा बनवून त्याचा वापर करू शकली नाही असा होतो.
हे ही वाचा.