मिरचीला मिळाला कोहिनूर हिऱ्याचा दर !
या वर्षी बदलत्या वातावरणामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी खूप त्रासलेले होते.
मध्यंतरी वातावरणामुळे मिरचीची आवक कमी झाली होती त्यामुळे बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय झाला होता. बदलत्या वातावरणामुळे उत्पादनात थोडी घट झाली मात्र दरात थोडी देखील घट झालेली नाही. यंदा इतर पिकांबरोबर मिरचीचे ही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादन थोडे कमी मिळाले मात्र मागणीत वाढ झाली आहे. मिरचीचा वापर त्याच्या जातीनुसार केला जातो. तर जवारी मिरचीची मागणी ही सर्वात जास्त प्रमाणत होत आहे. त्यामुळे त्याच्या भावाने तर आकाश गाठले आहे असे म्हणता येईल.
मिरचीला आतापर्यंत मिळालेला सर्वोच्च भाव
शनिवारी अजारा तालुक्यातील एका शेतकऱ्याने जवारी मिरची बाजारात विकण्यासाठी नेली असता त्यास चक्क १ लाख २१ हजार रुपयांची बोली होती. हा मिळालेला दर आता पर्यंतचा मिरचीला मिळालेला सर्वोच्च दर आहे. असे सांगण्यात येत आहे.
ज्वारी मिरचीस काय भाव मिळत आहे ?
बाजार समितीमध्ये जवारी पिकास तब्बल १ लाख २१ हजार प्रती क्विंटल दर मिळाला आहे. म्हणजेच प्रती किलो बाराशे दहा रुपये. एवढेच काय तर या दरात अजून वाढ होण्याची शक्यता दिसून येत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून दुखावल्या शेतकऱ्यांना मिरचीने खूप मोठा दिलासा आहे. मिरच्या वाढत्या दरामुळे मिरची पीक घेतलेला शेतकरी आनंदात आहे .