आता तब्बल ७ वर्षानंतर राज्यात बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार
काही वर्षांपूर्वी सर्वोच्च नायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घालती होती. परंतु आता ही बंदी उठवण्यात आली आहे. बैलगाडी शर्यत आयोजित करता येणार आहे. त्यामुळे बैलगाडा मालकांनी आनंद व्यक्त केला आहे. परंतु बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यासाठी काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. अगदीच नियमांच्या चौकटीत राहून ही शर्यत पार पाडावी लागणार आहे. बैलगाडी शर्यतीचे आयोजन पशु क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल.
काल राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला. त्यांनतर पेटा या संस्थेनें त्यांची बाजू मांडली. यावर सर्वोच्च न्यायालयाने राज्यात बैलगाडा शर्यतीस सशर्त परवानगी दिली आहे. या निर्णयानंतर बैलगाडा मालक आनंदात आहेत. बैलगाडा शर्यतीचा मार्ग हा तब्बल ७ वर्षांनी ओकला झाला आहे. बैलगाडा शर्यतीवरील उठवण्यात आलेल्या बंदीमुळे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी समाधान व्यक्त केले आहे.
बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले होते. विधान सभेपासून ते लोकसभेपर्यंत बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवावी अशी मागणी करण्यात आली होती. आता त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.
बैलगाडा शर्यत नियमांचे पालन करूनच आयोजन करावेत, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.