चक्क, ५० लिटरपर्यंत दूध देते ही गाय !
शेतकरी अधिक उत्पन्नासाठी जोडधंदा म्हणून गाईचे पालन करतात. गाईचे पालन योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे. गाईचे पालन करून जास्त नफा मिळावा यासाठी गाईच्या चांगल्या जातीची निवड करणे गरजेचे आहे. आपण आज अश्याच एका अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या गाई बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. ती म्हणजे गीर गाय. या गाईची रोगप्रतिकार शक्ती उत्तम असते. हिचे पालन केल्यास पशुधनाची हानी होण्याचा धोका कमी प्रमाणात असतो. चला तर जाणून घेऊयात गीर गाय विषयी अधिक माहिती.
गीर गाय –
१. मुख्यतः गुजरात येथील गीर जंगलामध्ये ह्या गाईचे पालन केले जाते. त्यामुळे या गाईच्या जातीस गीर असे नाव पडले आहे.
२. गुजरात बरोबर महाराष्ट्र, युपी, राजस्थान, एमपी, आदी राज्यात देखील गीर गाईचे पालन केले जाते.
३. गीर गाईच्या प्रामुख्याने स्वर्ण कपिला , देवमणी अश्या २ प्रगत जाती आहेत.
४. गीर गाईचा रंग लाल असून तिचे कपाळ रुंद व कान लांब असतात. यांचे शिंग लांब , वाकलेले असतात.
५. गीर गाय दिवसाला ५० लिटर दूध देण्याची क्षमता ठेवते
६. गीर गाईचे आयुष्य १५ वर्षांपर्यंत असते.
७. गीर गाय आपल्या संपूर्ण आयुष्यात १२ वासरांना जन्म देऊ शकते.
८. साधारणतः यांचे वजन ४५० किलो पर्यंत असते.
९. गीर गाईस चांगला , पोषक आहार देणे गरजेचे असते जेणेकरून जास्त दूध उत्पादन मिळेल.
गीर गाईची योग्य काळजी घेऊन त्यांना पोषक असा आहार दिल्यास दिवसाला ५० लिटर पर्यंत दूध देते. त्यामुळे या गाईच्या जातीचे पालन करणे फायद्याचे ठरते.