एक उत्तम संधी डाळिंबापासून प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्याची !
डाळिंब हे फळ दिसायला जितके आकर्षित दिसते त्याहून जास्त गुणधर्म डाळिंब फळामध्ये दडलेले आहे. बाजारामध्ये डाळिंबास मोठ्या संख्येने मागणी आहे. डाळिंब मध्ये अ, सी जीवनसत्वे, कॅल्शिअम, लोह, फॉलीक ऍसिड मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. डाळिंब आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी ठरते.अश्या बहुगुणी डाळिंबापासून अनेक प्रक्रियायुक्त पदार्थ बनवले जातात. डाळिंबापासून तयार होणाऱ्या विविध प्रक्रियायुक्त पदार्थांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
डाळिंबापासून तयार होणारे प्रक्रियायुक्त पदार्थ-
डाळिंबाचा रस –
१. डाळिंब फळास आकर्षक रंग तसेच गोडी असते. त्यामुळे या रसास मागणी चांगली आहे.
२. डाळिंबाचा रस इतर फळाच्या रसामध्ये मिसळला तर ते पेय अधिक चविष्ट होते.
३. डाळिंबाचा रस तयार करण्यासाठी फळे स्वच्छ धुवून त्यातील बिया काढून वेगळ्या करून घ्याव्यात.
४. त्या बिया मिक्सर मधून काढून त्याचे द्रावण तयार करून घ्यावे.
५. हे द्रावण ८० ते ८२ अंश सेल्सिअस तापमानास गरम करावे. २४ तास यास थंड होण्यासाठी ठेवावे.
६. हा तयार रस जास्त काळ टिकून राहावा यासाठी त्यामध्ये ६०० पीपीएम बेन्झोएट मिसळावेत.
७. निर्जंतुकीकरण केलेल्या बाटलीमध्ये हा रस साठवून ठेवावा.
अनारदाना-
१. डाळिंबाचे चांगले पिकलेले फळ घ्यावेत.
२. डाळिंबाचे दाणे काढून उन्हात वाळवावेत.
३. पदार्थ आंबवतांना चिंच, आमसूल प्रमाणे अनारदाण्याचा वापर केला जातो.
प्रक्रियायुक्त पदार्थ-
१. डाळिंबापासून अनेक चविष्ट, पौष्टिक पदार्थ तयार करता येतात.
२. डाळिंब फळापासून सरबत , जॅम , जेली, सिरप, दंतमंजन यांसारखे पदार्थ तयार करता येतात.
डाळिंबपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केले जातात. ज्यांना बाजारामध्ये मोठ्या संख्येने मागणी आहे.