बडीसोप लागवड मिळवून देईल चांगला नफा
भारत,इजिप्त , चीन या देशात बडीसोपची लागवड केली जाते. मसाले पदार्थांमध्ये बडीसोप ला महत्वाचे स्थान आहे.महाराष्ट्रात २२८९० हेक्टरी जमीन बडीसोप लागवडी खाली आहे. लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना लोकप्रिय असणारी बडीसोप जेवणानंतर , चहापाणी नंतर खाण्याची प्रथा आपल्या भारतामध्ये आहे. बडीसोप चा वापर सूप , चटणी , लोणचे , चॉकलेट, सॉस यांमध्ये करतो.बडीसोप पचनास हलकी असते. बडीसोप मध्ये अनेक गुण दडलेले आहेत. याची निर्यात जपान , आफ्रिका , मलेशिया सौदी अरेबिया या देशात केली जाते. जाणून घेऊयात बडीसोप लागवडी बद्दल माहिती.
जमीन व हवामान –
१. बडीसोपची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते.
२. पाण्याचा उत्तम निचरा करणारी , कसदार जमीन या पिकास मानवते.
३. दमट व ढगाळ हवामानाचा या पिकांवर विपरीत परिणाम होतो.
४. रब्बी हंगामात या पिकाची लागवड केली जाते.
पूर्वमशागत –
१. उभी आडवी नांगरणी करून जमिनीवरील ढेकळे फोडून काढावीत.
२. कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या देऊन माती मऊ करून घ्यावीत.
३. तीन मीटर लांब सपाट वाफे तयार करावेत.
४. मातीमध्ये चांगले कुजलेले शेणखत मिसळून घ्यावे.
बियाणे –
प्रति एकर जमिनीस ४ ते ५ किलो बियाणे लागतात.
पाणी व्यवस्थापन –
१. बडीसोपचे पाणी व्यवस्थापन काळजीपूर्वक केले पाहिजे.
२. हवामानाचा अंदाज घेऊन १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
३. जमिनीत ओलावा नसेल किंवा कमी असेल तर जमीन हलकी ओली करावी.
काढणी –
१. पूर्ण परिपक्व बडीसोपच्या आकाराच्या निम्म्या आकाराची बडीसोप चवीस गोड लागते.
२. फुले आल्यापासून ३० ते ४० दिवसात बडीसोप काढणीस तयार होतात.
उत्पादन –
हेक्टरी १५ ते १७ क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते.
बडीसोपचे योग्य व्यवस्थापन , योग्य वेळेत काढणी केली तर त्यापासून उत्पादन चांगले मिळून अधिक उत्पन्न मिळते.