रोग आणि नियोजन

हानिकारक फळमाशी पासून फळबाग वाचवा.

Shares

महाराष्ट्रात शेतकरी फळबागांकडे वळत आहे. फळबागांची शेती करत असतांना हवामान , रोग , किडी अश्या अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते.किडीमुळे फळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. सर्वात जास्त हानी फळमाशी करते. फळमाशीच्या जगभरात अनेक प्रजाती आहेत.जानेवारी महिन्याच्या शेवटी फळमाशीचा प्रादुभाव दिसायला लागतो.पेरू , डाळिंब , पपई , आंबा आदी फळांबरोबर कारले , काकडी , भोपळा अश्या वेलवर्गीय फळांवर देखील यांचा प्रादुर्भाव दिसून येतो. एका वर्षात फळमाशीचे कमी वेळात अनेक पिढ्या तयार होतात. फळमाशी कोरेंटाइन कीड म्हणून ओळखली जाते. जाणून घेऊयात फळमाशीबाबत संपूर्ण माहिती.

फळमाशीचा प्रादुर्भाव झाल्याची लक्षणे –
१. फळमाशीचा प्रादुर्भाव झाला असेल तर फळे वाकडी- तिकडी दिसतात.
२. फळांमध्ये कडकपणा येतो.
३. लहान फळे परिपक्व झाल्यासारखी दिसायला लागतात.
४. फळमाशीचा जास्त प्रादुर्भाव झाल्यास फळांमध्ये अळ्या होऊन त्यांना बुरशी लागते.
५. फळांना डाग पडतात.
६. मोठ्या संख्येने फळ गळती होते.

फळमाशी नियंत्रण उपाययोजना –
१. फळबाग तण विरहित व स्वच्छ ठेवावी.
२. फळबाग लागवड करतांना बागांमध्ये मक्षीकारी सापळे वापरावेत.
३. बागेत खाली पडलेली रोगग्रस्त फळे मातीत खोलवर पुरून नष्ट करून टाकावीत.
४. फळे पूर्ण पक्व होण्याअगोदर काढावीत.
५. जमिनीची सारखी वखरणी करावी.
६. फळधारणेच्या वेळी निंबोळी अर्क १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
७. उपलब्ध असल्यास प्रतिकारक जातीची निवड करावीत.

फळमाशी सर्वात जास्त फळबागेचे नुकसान करते. त्यामुळे फळमाशीचे नियोजन करणे महत्वाचे ठरते.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *