शरीरातील रक्त वाढण्यासाठी आहार
शरीरात रक्ताशी निगडित थोडा जरी बदल झाला कि आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. जर हिमोग्लोबिन , रक्तातील लोह आदी कमी झाले तर लवकर थकवा जाणवायला लागतो , चक्कर येते , उत्साह राहत नाही. रक्ताचे प्रमाण वाढावे यासाठी पौष्टिक आहार घेणे गरजेचे असते याचबरोबर करता येणारे उपाय आपण जाणून घेऊयात.
उपाय –
१. रात्रीचे जेवण झाल्यास दररोज शेंगदाणे आणि गूळ खावे.
२. रात्री झोपण्यापूर्वी दुधात खजूर मिसळून पिणे फायद्याचे ठरते.
३. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मक्याचे दाणे उकडून किंवा भाजून खावेत.
४. रोजच्या आहारात मोड आलेल्या कडध्यानांचा समावेश करावा.
५. ग्लासभर पाण्यात लिंबू पिळून त्यात चमचाभर मध घालून प्यावे.
६. टोमॅटो सूप किंवा टोमॅटोचा रस प्यावा.
७. रोज एक सफरचंद खावे.