आरोग्यवर्धक कारल्याचा चहा
ज्या भाजीचे फक्त नाव ऐकून लहान मुलांपासून पासून मोठ्यापर्यंत सर्वजण नाक मुरडतात अश्या कडू कारल्यामध्ये अनेक गुणधर्म दडलेले आहेत. सध्या लोकांमध्ये आरोग्याबाबद जागरूकता निर्माण होत आहे. त्यामुळे कारल्यापासून बनवल्या जाणाऱ्या पदार्थांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. वाळवलेले कारले जास्त दिवसापर्यंत टिकून राहते. त्यापासून अनेक पदार्थ बनवता येतात या पदार्थांमधील कारल्याचा चहा आता प्रसिध्द होत आहे.कारल्याच्या चहास गोयाह चहा म्हणून देखील ओळखले जाते. हा चहा आरोग्यवर्धक असून याची मागणी वाढत चालली आहे. तर जाणून घेऊयात कारल्याचा चहाबद्दल अधिक माहिती.
चहा तयार करण्याची पद्धत –
१. सर्वप्रथम कारले स्वच्छ धुवून घ्यावीत.त्याच्या वरील पृष्ठभाग साफ करून घ्यावा.
२. कारल्यामधील बिया व त्यातील गर काढून टाकावा आणि त्याच्या पातळ चकत्या करून घ्याव्यात. जितक्या बारीक चकत्या कराल तितक्या लवकर ते वाळतील.
३. हे काप एका ट्रे मधून त्यावर जाळी लावावी जेणेकरून त्यावर कीटक आणि धूळ बसणार नाही.
४. हा ट्रे सूर्यप्रकाशात वाळवण्यासाठी ठेवावेत.काही तासांनंतर हे काप उलट्या बाजूने ठेवावेत. कारल्याचे काप संपूर्ण वाळण्यासाठी १ ते २ दिवस लागतात.
५. वाळलेल्या कारल्याची भुकटी करून ती थंड , कोरड्या जागी हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवावी.
६. एक चमचा कारल्याची भुकटी एक कप गरम पाण्यात टाकून ढवळून त्यात आपल्या आवश्यकतेनुसार १ किंवा २ चमचे मध टाकावे.
कारल्याच्या चहाचे फायदे –
१. कारल्यामध्ये बीटा -केरोटीन आणि अ जीवनसत्वे असल्याकारणाने दृष्टीसंबंधातील समस्यांवर हा एक रामबाण उपाय आहे.
२. कारल्यामध्ये विषाणू आणि जिवाणूंशी लढण्याची क्षमता असते त्यामुळे विविध ऍलर्जी रोखण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
३. कर्करोगाविरुध्द उपचारामध्ये कारल्याचा उपयोग केला जातो.
४. वजन कमी करायचे असेल रोजच्या आहारात कारल्याच्या चहाचे सेवन करावे
५. त्वचा व केसांच्या चमकदारपणांसाठी कारले उत्तम ठरते.
६. कारल्यातील लोह आणि फोलिक आम्लामुळे हृदयरोगाचा धोका टळतो.
अनेक आजारांवर कारले हा नैसर्गिक उपाय आहे.औषधी गुणधर्मयुक्त कारल्याच्या चहाचे सेवन दररोज केल्यास तुम्हाला निरोगी राहण्यास मदत होईल.