काय आहे चंदन कन्या योजना..
महाराष्ट्र सरकारने चंदन उत्पादक शेतकरी संघ यामध्ये चंदन कन्या योजनेमार्फत चंदन कन्या हा उपक्रम राबविला आहे. चंदन कन्या योजनेतून मुलींच्या लग्नाला व शिक्षणासाठी मिळतील 10 ते 15 लाख रुपये. या योजने मार्फत मुलींच्या शिक्षणासाठी तसेच लग्नासाठी रकमी 10 ते 15 लाख रुपये मिळतील पण त्या साठी काही अटी लागू होतात .
चंदन कन्या योजनाचे फायदा व सुविधा –
१. मुलीच्या नावाने लागवडीसाठी कमीत कमी १०० चंदन झाडे तालुकास्तरावर रोपे मिळतील.
२. मुलीचे आधार कार्ड नोंद करावे लागेल.
३. चंदन लागवडीसाठी तुम्हाला मोफत मार्गदर्शन दिले जाईल.
४. लागवडीनंतर एक वर्षाने तुम्हाला जन्माचा दाखला द्यावा लागेल.
५. चंदन झाडांची नोंद सातबारावर नोंद घेण्यासाठी तुम्हाला कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही. त्याची मोफत नोंद होईल.
६. मुलींच्या वडिलांचे आधार कार्ड द्यावे लागेल.
७. झाडांची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्याची तोडणी व वाहतूक परवाना काढण्यासाठी मोफत परवानगी दिली जाईल.
८. चंदन कन्या योजना नोंदणीसाठी सामाजिक वनीकरण विभागात तसेच कार्यालयात नोंदणी करावी लागेल.
९. चंदनाचे झाड बांधावरती लागवडीसाठी तुम्हाला शुल्क 6500 रुपये असलेले अनुदान योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला माहिती दिली जाईल.
१०. चंदन कन्या योजना फ्रॉम साठी तुमचे नाव किमान तालुक्यामधील वीस शेतकऱ्यांनी नोंद केलेल्या तालुक्यात नोंद पाहिजे .
११. ही महाराष्ट्र कृषी विभाग सामाजिक वनीकरण आणि महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ यांची लागवड अनुदान योजना आहेत.
१२. चंदन लागवड करणे व तोडणी करणे हे संपुर्ण कायदेशीर आहे चंदन लागवड केल्यास आपल्या शेतजमिनीच्या सातबारावरील इतर मालमत्ता हक्कात आपण लावलेल्या चंदन झाडाची नोंदणी करणे आवश्यक आहे. या नोंदीच्या आधारे चंदन झाड तोडणे योग्य झाल्यास वन विभागाकडून रीतसर अर्ज करून तोडणी व वाहतूक परवाना मिळवता येतो.
१३. नैसर्गिक संकट, आग, चोरी, नापीक याबाबत चंदन झाडांचा पिक विमा सुद्धा घेता येतो.