शेतकऱ्यांना होणार CNG ट्रॅक्टरचा फायदा.. वाचा कसा

Shares

पहिल्या काळी शेतीची मशागत ही बैलाने केली जायची. सध्या पारंपरिक पद्धतीने कोणताच शेतकरी शेती करत नाही.आता च्या काळात सर्व जण ट्रॅक्टर चा उपयोग करू लागले आहेत.ट्रॅक्टर चा उपयोग तसेच अत्याधुनिक अवजारांचा उपयोग शेतकरी करू लागला आणि कमी वेळात शेतीची भरपूर कामे होऊ लागली.आता ट्रॅक्टर ने शेती करणे सुद्धा खूपच अवघड झाले आहे. पेट्रोल आणि डिझेल चे भाव आभाळपर्यंत गेले आहेत. सध्या चा डिझेल चा दर हा ९५ रुपये लिटर एवढा झालेला आहे. त्यामुळं डिझेल वर ट्रॅक्टर चालवणे खूपच अवघड होऊन बसले आहे.आता मार्केट मध्ये अनेक नवनवीन टेक्नॉलॉजी विकसित होत आहेत. आता बरीच वाहने इलेक्ट्रिक आणि गॅस वर तयार होऊ लागली आहेत.

शेतकऱ्यांचे उत्पन्न अधिक आणि खर्च कमी व्हावे हा उद्देश साध्य करताना सरकारने आता डिझेल ट्रॅक्टरला सीएनजी ट्रॅक्टरचा पर्याय उपलब्ध केला आहे. सीएनजी ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांना आपले जीवनमान सुधारण्यास मदत होईल. डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत रेट्रेफिटेड सीएनजी टॅक्टरचा देखभालीचा खर्च कमी असेल आणि यामुळे इंधन बचतही होईल.मार्केट मध्ये आता नवी  CNG वर चालणार ट्रॅक्टर आला आहे.CNG ट्रॅक्टर चा उपयोग केल्या नंतर प्रति वार्षिक शेतकऱ्यांना २ लाख रुपये एवढा फायदा होणार आहे. सोबतच २०२२ पर्यंत शेतकऱ्यांना आपले उत्पादन डबल संख्येने वाढवता येणार आहे.डिझेल ट्रॅक्टरच्या वापराच्या तुलनेत सीएनजी ट्रॅक्टरचा खर्च हा खूपच कमी असतो. तसेच प्रदूषणाचे प्रमाण ७० टक्क्यांहून कमी होते.असे अनेक प्रकारचे फायदे शेतकऱ्यांना होणार आहेत.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *