बेदाणा प्रक्रिया संपूर्ण माहिती
द्राक्षे हे फळ लवकर खराब होते.त्यामुळे द्राक्षाचे बेदाणे बनवले तर त्याचा आर्थिक फायदा जास्त होईल.बेदाणा विकल्यास दुप्पट-तिप्पट पटीने फायदा होईल. प्रामुख्याने बेदाण्यासाठी थॉम्प्सन सीडलेस या जातीचा वापर केला जातो.
बेदाण्यामधील वैशिष्टे-
१. बेदाण्याच्या आकारातील एकसारखेपणा प्रतीच्या दृष्टीने महत्त्व आहे.
२. याशिवाय बेदाण्यातील मांसल गर हा देखील प्रत वाढवण्यास कारणीभूत ठरतो.
३. बेदाण्याच्या तेजस्वी नैसर्गिक रंग शक्य तेवढा टिकणे चांगल्या प्रतीच्या बियाण्यांच्या बाबतीत अपेक्षित आहे.
४. हिरव्या द्राक्षापासून बनवलेल्या पिवळसर रंगाच्या बेदाण्यास जास्त मागणी असल्याचे आढळते.
५. एकंदरीतच चांगल्या प्रतीच्या बेदाण्यासाठी रंगातील एकसारखेपणा महत्त्वाचा घटक आहे.
६. बेदाण्याचा पोत, चमकदारपणा, लवचिकता म्हणजेच बोटांमध्ये दाबल्यानंतर पुन्हा पूर्ववत आकार देण्याची क्षमता देखील हवी.
७. चांगल्या प्रतीच्या बेदाण्याच्या बाहेरील घराचा पोत चांगला असणे म्हणजेच त्या बेदाण्यास असंख्य सूक्षमऊ सुरकुत्या असायला हव्यात. लांबलचक मोठ्या कोनात्मक सुरकुत्या कमी प्रतीचा बेदाणा दर्शवतात.
हवामान-
१. द्राक्षे सुकविण्यासाठी द्राक्षशेती केल्या जाणाऱ्या भागांमध्ये ठराविक दिवसांसाठी रोजचे सरासरी तापमान १० डिग्री सेल्सिअसच्या वर असल्यास ते सुकविण्यासाठी आवश्यक तेवढी उष्णता लाभते. २. २२ डिग्री सेल्सिअसच्या वाढीच्या हंगामात शीतलाट किंवा पावसाची अतिशय कमी शक्यता आणि उष्ण, पाऊस विरहित उन्हाळा अशी परिस्थिती उत्कृष्ट बेदाणा निर्मितीसाठी उत्तम ठरते.
मण्यांचा दर्जा-
१. मनी अपरिपक्व किंवा अतिपक्व नसावे.
२. मण्यांचा आकार व पक्वता ही एक सारखी असावी.
३. मण्यांवर कुठल्याही प्रकारची इजा नसावी व सर्व मण्यांना एकसारखा आकर्षक रंग असावा.
४. साल पातळ असावी व गर घट्ट असावा.
द्राक्ष सुकविण्यासाठी जागा कशी असावी-
१. द्राक्ष सुकवण्यासाठी वापरले जाणाऱ्या रेक्सच्या खाली जमिनीवर आच्छादन वापरणे गरजेचे आहे. २. रॅक असलेल्या ठिकाणी सतत परंतु संत कोरडी हवा रॅकच्या टप्प्यांमधून वहात ठेवण्याची व्यवस्था असावी.
३. मोकळ्या व कोरड्या जागेत ठेवावयाची असेल तरी त्यातील कप्प्यांमध्ये ठराविक अंतर ठेवावे.
४. रॅक अशाप्रकारे लावावे जेणेकरून कप्यांमधील द्राक्षांपर्यंत सूर्यप्रकाश पोहोचणार नाही.
५. यासाठी शेडनेट सूर्याच्या दिशेने रेकवर लावणे गरजेचे आहे.
६. सौर उर्जेवर किंवा विजेवर आधारित द्राक्ष सुकविण्यासाठी यंत्रणा वापरून द्राक्ष सुकविण्यासाठी कालावधी कमी करता येतो.
७. अशा यंत्रणेमध्ये हवा खेळती राहण्याची व्यवस्था असावी.
८. त्यातील आद्र हवा सतत बाहेर पडण्याच्या दृष्टीने व्यवस्था असावी.
९. अशा यंत्रणेत ५५ ते ५८ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान नियंत्रित केलेले असावे.
१०. अशी यंत्रणा वापरल्यास अधिक चांगल्या परिस्थितीत बेदाणा निर्मिती व त्याची साठवण करता येते.
द्राक्षे सुकविण्या पूर्वी त्यावर केली जाणारी प्रक्रिया-
द्राक्ष मण्यावर भरपूर प्रमाणात असणारी पाण्याला न चिकटणारी पांढऱ्या रंगाची लव मेणाच्या पातळ थरांनी बनलेले असते. ही लव घालवण्यासाठी व द्राक्ष लवकरात लवकर सुकविण्यासाठी या द्राक्ष मण्यांवर काढणीनंतर रासायनिक प्रक्रिया करणे महत्त्वाचे ठरते.
१. सल्फर डायऑक्साईड वायूचे धुरी देणे किंवा
२. सोडियम कार्बोनेट ऑलिव्ह ऑइल बरोबर वापरून घड कुज घडविणाऱ्या सूक्ष्म जीवांवर नियंत्रण आणता येते.
३. बेदाण्याचे ऑक्सडेंटिव्ह ब्राऊनिंग यावर देखील नियंत्रण ठेवता येते.
अशाप्रकारे सोप्या आणि सहज पद्धतीने बेदाणा निर्मिती करता येते.