रोग आणि नियोजन

अन्नद्रव्यांचे प्रकार व त्यांचे महत्त्व

Shares

पिकांच्या वाढीसाठी लागणाऱ्या आवश्‍यक अन्नद्रव्ये जाणून घेऊन त्यांचा समतोल पुरवठा केल्यास पिकांच्या उत्पादनामध्ये चांगली वाढ होऊ शकते. जमिनीचा सामू हा सात च्या दरम्यान असला पाहिजे. अशा स्थितीत रासायनिक आणि जैविक क्रिया चांगल्या होऊन अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असतात असे नाही. ज्या अन्नद्रव्यांची कमतरता भासल्यास पिकांच्या वाढीवर परिणाम होतो, अशी १७ मूलद्रव्ये महत्त्वाची मानली जातात. त्यातील मोठ्या प्रमाणात लागणारी कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन ही अन्नद्रव्ये पिकांना हवा व पाण्यातून मिळतात. उर्वरित १४ अन्नद्रव्ये जमिनीतून मिळत असतात. जमिनीचा सामू ७ (उदासीन) च्या दरम्यान असला पाहिजे.

पिकांच्या वाढीसाठी लागणारे अन्नद्रव्य आणि त्यांचे स्त्रोत –

१. जमीन आणि खतांमधून पुरवठा होणाऱ्या अन्नद्रव्य – मुख्य अन्नद्रव्य = नत्र, स्फुरद आणि पालाश हे मुख्य अन्नद्रव्य आहेत.

२. हवा आणि पाणी या मधून पुरवठा होणाऱ्या अन्नद्रव्य – कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचा पुरवठा हवा आणि पाण्यामधून होतो.

३. सूक्ष्म अन्नद्रव्य – लोह, मॅगेनीज, जस्त, तांबे, बोरॉन एखादी सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत.

४. दुय्यम अन्नद्रव्य – कॅल्शियम मॅग्नेशियम आणि गंधक त्यांना दुय्यम अन्नद्रव्य म्हणतात.

पीक वाढीसाठी आवश्यक मूलद्रव्ये ठरवण्याकरता महत्त्वाचे तीन बाबी –

  • १. मूलद्रव्यांच्या पिकाच्या वाडीमध्ये घटक अन्नद्रव्य म्हणून प्रत्यक्षपणे सहभाग असला पाहिजे.
  • २. मूलद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकांची शाकीय वाढ आणि उत्पादन वाढ पूर्णपणे होत नाही.
  • ३. प्रत्येक मूलद्रव्यांची कमतरतेची लक्षणे ही विशिष्ट प्रकारची असतात.
  • मुख्य अन्नद्रव्ये –
  • १. यामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नत्र, स्फुरद आणि पालाश या सहा अन्नद्रव्यांचा समावेश होतो.
  • २. ही अन्नद्रव्ये पिकांकडून मोठ्या प्रमाणात शोषली जात असल्याने त्यांना मुख्य अन्नद्रव्ये असे म्हणतात. यापैकी प्राणवायू, हायड्रोजन आणि कर्ब ही अन्नद्रव्ये पिकांना अधिक प्रमाणात लागतात.
  • ३. त्यांचा पुरवठाही जमिनीतील पाणी आणि हवा याद्वारे सहजपणे होतो.
  • ४. जैविक क्रियेमध्ये या तिन्ही मूलभूत अन्नद्रव्यांचा फार महत्त्वाचा वाटा आहे.
  • ५. पिकांच्या एकूण वजनापैकी सुमारे ९४ टक्क्याहून जास्त भाग या तीन अन्नद्रव्यांनी व्यापलेला असतो. याव्यतिरिक्त नत्र, स्फुरद आणि पालाश ही अन्नद्रव्ये पिकांना मोठ्या प्रमाणात लागतात.
  • ६. जमिनीतील ओलाव्यामध्ये विद्राव्य व मातींच्या कणांवर अधिशोषित असणाऱ्या या अन्नद्रव्यांचा वापर पिकांच्या मुळाद्वारे केला जातो.
  • ७. जमिनीमधून या अन्नद्रव्यांचा होणारा पुरवठा साधारणपणे मध्यम ते कमी प्रमाणात असतो.
  • ८. पिकांची गरज भागविण्यासाठी सेंद्रिय तसेच रासायनिक खतांचा वापर आवश्यक असतो.
  • ९. महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणपणे नत्राची कमतरता सर्वदूर दिसून येते, तर स्फुरद कमी ते मध्यम स्वरूपात आहे.
  • १०. काळ्या खोल जमिनीमध्ये पालाश पुरेशा प्रमाणात असते.
  • सूक्ष्म अन्नद्रव्य –
  • १. सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये लोह, मॅग्नेशियम, जस्त, तांबे, मॉलिब्डेनम, क्लोरीन इत्यादी अन्नद्रव्यांचा समावेश होता.
  • २. सूक्ष्म अन्नद्रव्य पिकांना कमी प्रमाणात लागतात. ३. सुपीक जमिनीमध्ये कमतरता दिसून आल्यास या अन्नद्रव्यांचा पुरवठा सेंद्रिय किंवा रासायनिक खतांद्वारे करावा लागतो.
  • दुय्यम अन्नद्रव्ये –
  • १. नेशिअम आणि गंधक या तीन अन्नद्रव्यांना वनस्पतींची दुय्यम अन्नद्रव्ये म्हणतात. यांची गरज मध्यम प्रमाणात असते.
  • २. तेलबिया पिकांखालील जमिनीमध्ये गंधकाची कमतरता मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.
Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *