या शेतीपूरक उद्योगातून मिळवा दिवसाला ४ ते ५ हजार रुपये.
जवळजवळ सर्वच जण कोणता उद्योग करून अधिक नफा मिळवता येईल या शोधात असतात. आता तुमचा शोध संपला असे म्हणता येईल. आम्ही तुमच्यासाठी एक असा उद्योग घेऊन आलोय ज्यामधून तुम्ही दिवसाला ४ ते ५ हजार रुपये कमवू शकता आणि या उद्योगासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण घेण्याची गरज नाही. चला तर जाणून घेऊयात अधिक नफा मिळवून देणाऱ्या कॉर्न फ्लेक्स च्या उद्योगाबद्दल संपूर्ण माहिती.
कॉर्न फ्लेक्स उद्योग –
१. आपल्या सर्वांना मका माहिती आहे. मक्यापासून विविध प्रकारचे पदार्थ बनवता येतात.
२. कित्तेक लोक सकाळी कॉर्न फ्लेक्सचा वापर नाष्ट्यात करतात.
३. मका हा आरोग्यासाठी उपयुक्त मानला जातो.
४. कॉर्न फ्लेक्स बनवण्याच्या यंत्राचा वापर करून गहू, तांदळाचे फ्लेक्स देखील बनवता येतात.
५. मका लागवड जास्त प्रमाणात होत असलेल्या ठिकाणी कॉर्न फ्लेक्स उद्योग सुरु केल्यास फायदा होतो.
कॉर्न फ्लेक्स उद्योगासाठी जागेची निवड –
१. कॉर्न फ्लेक्स उद्योगासाठी जागेची निवड करतांना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते.
२. या उद्योगासाठी तुमच्याकडे २ ते ३ हजार स्क्वेअर फूट जमीन असावी लागते. जेणेकरून तुम्ही त्यावर स्वतःचा उद्योग उभा करू शकाल.
३. या उद्योगात माल साठवून ठेवण्यासाठी जागेची आवश्यकता असते.
४. कच्चामाल, मशीन , स्क्रॅप आदी वस्तू ठेवण्यासाठी गोदामाची आवश्यकता असते.
गुंतवणूक व त्यातून होणार नफा –
१. या उद्योगामध्ये किती रुपयांची गुंतवणूक करावी हे तुमच्यावर अवलंबून आहे.
२. या उद्योग सुरु करण्यासाठी साधारणतः ५ ते ८ लाख रुपये पर्यंत गुंतवणूक करता येते.
३. एक किलो कॉर्न फ्लेक्स तयार करण्यासाठी किमान ३० रुपये पर्यंत खर्च येतो.
४. बाजारात एक किलो कॉर्न फ्लेक्स ७० रुपयांपर्यंत विकला जातो.
५. दिवसाला जर १०० किलो कॉर्न फ्लेक्स विक्री केल्यास महिन्याला १ लाख २० हजार रुपये कमवता येते.
या उद्योगातून तुम्ही अगदी सहजपणे १ लाख २० हजारापर्यंत रुपये कमवू शकता .