इतर बातम्या

या झाडाची शेती करा, सरकार घेणार विकत !

Shares

शेतकरी नेहमी जास्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या पिकाच्या शोधात असतो. नगदी , औषधी वनस्पती लागवडी मध्ये सर्वाधिक नफा असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल औषधी वननस्पतींकडे वाढत चालला आहे. कमी क्षेत्रात देखील यांची लागवड करता येत असून बाजारात यास मोठ्या संख्येने मागणी आहे. अशीच एक मोठ्या संख्येने मागणी असणारी औषधी वनस्पती म्हणजे चंदन. चंदन पिकास भारताबरोबर परदेशातही मोठ्या प्रमाणात मागणी तर आहेच परंतु त्याच बरोबर यास किंमत देखील जास्त आहे.चला तर चंदनाची अधिक माहिती जाणून घेऊयात .
चंदन लागवड कशी ठरते फायदेशीर ?
१. आधुनिक पद्धतीने चंदन पिकाची लागवड केल्यास साधारणतः १५ वर्षात उत्पन्न मिळण्यास सुरुवात होते.
२. या वनस्पतीपासून अगदी सहजच करोडोचे उत्पन्न मिळवता येते.
३. चंदन पिकाची मागणी जास्त परंतु उत्पादन कमी असल्यामुळे सध्या त्याचे भाव आकाशाला भिडत आहे.

चंदन पिकाबाबदल थोडं जाणून घेऊयात-
१. चंदनाची लागवड केल्यानंतर त्याचे संरक्षण करणे देखील गरजेचे आहे. या पिकावर जंगली पशूंनी हल्ला करण्याची शक्यता असते.
२. चंदन लागवड ही वाळवंटी , थंड प्रदेशाबरोबर जवळजवळ सर्वच प्रकारच्या प्रदेशात करता येते.
३. चंदनाचा वापर हा आयुर्वेदिक औषध, अत्तर, कॉस्मेटिक्स बनवण्यासाठी केला जातो. भारतात चंदनास खूप महत्व दिले जाते.
४. चंदन लागवडीनंतर १५ वर्षांनी चंदन काढणी करण्यास सुरुवात करता येते.

चंदन उत्पादन व उत्पन्न –
१. चंदनाचे लाकूड ७ हजार रुपये प्रति किलो प्रमाणे विकले जाते.
२. चंदनाचे झाड विकसित झाल्यानंतर एका झाडापासून २० किलोपर्यंत लाकूड मिळते.
३. चंदनाची एक एकर वर लागवड केल्यास त्यास २५ लाखापर्यंत खर्च येत असून त्यातून सव्वा ते दीड करोड रुपयांचे उत्पन्न मिळवता येते.

टीप- सरकारने सर्वसामान्य माणसाला चंदन लागवड करण्यास बंदी घातली असून शेतकरी चंदनाची लागवड करू शकतो. शेतकऱ्यांकडून चंदनाचे लाकूड सरकार विकत घेते.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *