नियमित व्याज अदा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार !
पिकाची लागवड करतांना शेतकरी कर्ज काढत असतो. त्यातील काही शेतकरी वेळेवर कर्ज परतफेड करतात तर काही शेतकऱ्यांना कर्ज परतफेड करण्यास उशीर होतो. कोरोनाचे संकट उध्दभवण्यापूर्वी सरकारने शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर देण्याचे ठरवले होते. मात्र नंतर थकबाकीदारांना याचा लाभ घेता आला नाही. शेतकऱ्यांना ३ लाखापर्यंत शुन्य व्याजदरावर कर्ज देणार असल्याचे उपमुख्यमंत्री ने सांगितले आहे. मात्र सरकारच्या या योजनेचा लाभ नियमित कर्ज वेळेवर अदा करणाऱ्या शेतकऱ्यांना घेता येणार आहे कि नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. या प्रोत्साहनपर देण्याची घोषणा करून भरपूर काळ लोटला आहे. तरीही अजून याची अंबलबजावणी झालेली नाही. हिवाळी अधिवेशनात पुन्हा हा प्रश्न उपस्थित करत कधी मिळणार प्रोत्साहनपर असा प्रश्न केला आहे.
प्रोत्साहनपर रक्कमेबाबत काय झाली होती घोषणा ?
ज्या शेतकऱ्यांनी २ लाखांपर्यंत कर्ज घेतले होते त्यांची पडताळणी करण्यात आली होती. यांपैकी ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे परतफेड केली आहे अश्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर देणायचा निर्णय घेण्यात आलेला होता. मात्र कोरोना संकटामुळे ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. सरकारने जाहीरपणे सांगितले होते की शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर देण्यात येईल. मात्र अजूनही याची पूर्तता झालेली नाही.