कापसाला आतापर्यंतचा सर्वात उचांकी भाव !
कापसाला सध्या मिळलेल्या दरामुळे शेतकरी सुखावला आहे. बाजार समितीमध्ये कापसाला चांगला भाव मिळाला आहे. तसेच कापूस (Cotton) खरेदी केंद्रावर गर्दी दिसू लागली आहे. कापसाच्या दरात आता अजून वाढ होण्याची शक्यता दिसून येत आहे. सुरवातीला कापसाचे दर चांगले होते. नंतर या दरात घसरण होऊन हे दर थेट ७ हजारावर येऊन थांबले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस साठवणुकीवर भर दिला होता. आता मात्र बाजार समितीमध्ये कापसाला ९ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. आता या दरात अजून वाढ होऊन सध्या दर ९ हजार ५८५ रुपये झाला आहे.
हे ही वाचा (Read This Also ) युवा शेतकऱ्यांना मिळणार शासनाकडून या व्यवसायासाठी 50% अनुदान.
देवळी मधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या केंद्रावर कापसाला उचांक दर मिळाला आहे. या बाजार समितीमध्ये तालुका तसेच जिल्ह्यातून कापसाची मोठ्या संख्येने आवक होत आहे. सुरवातीला शेतकऱ्यांनी कापूस मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी आणला होता तर कालांतराने कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कापसाचे प्रमाण कमी झाले होते. कापसाची आवक कमी झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी कापसाला ९ हजार ५८५ रुपये असा उचांक दर दिला आहे. येत्या काळात कापसाची आवक वाढण्याची शक्यता दर्शवली जात आहे. त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहे. देवळी मध्ये कापूस खरेदी सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत २ लाख १० हजार ३०० कापूस खरेदी करण्यात आलेला आहे. येत्या काही दिवसांमध्ये कापसाचे दर १० हजारांपर्यंत होण्याची शक्यता आहे.