सोयाबीनच्या दरात वाढ, काय आहे राज्य सरकारचे नवीन धोरण ?
सोयाबीनचे दर हे चढ उतारीनंतर आता स्थिरावले आहेत. गेल्या कित्तेक दिवसापासून शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवणूक करून ठेवला आहे. मात्र आता शेतकऱ्यांना वेळीच निर्णय घेण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे. याचे कारण म्हणजे सोयाबीनच्या दरामध्ये सतत चढ उतार तर कधी स्थिरता असे चित्र दिसून येत आहे.
हे ही वाचा (Read This ) पीएम किसान: eKYC ची शेवटची तारीख पुन्हा वाढवली, OTP नव्हे तर आधारने प्रक्रिया होईल पूर्ण
गेल्या १५ दिवसापासून सोयाबीनचे दर हे ७ हजार ५०० वर स्थिरावले होते. आता दरामध्ये किंचित वाढ झालेली दिसत आहे.
सोयाबीनचे आजचे दर
यंदा परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये सोयाबीन आणि कापूस या मुख्य पिकांचे अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे. तर कृषी मंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागीय अधिकारी यांची बैठक पार पडली असून यामध्ये मूल्यसाखळीचे धोरण ठरविण्यात आले आहे.
हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांसाठी खूशखबर, यंदा मान्सून सामान्य राहण्याची शक्यता, खरीप पिकांचे बंपर उत्पादन होणार
अर्थसंकल्पातील तरतुदीचा फायदा?
विदर्भात कापूस तर मराठवाड्यात सोयाबीनची मोठ्या संख्येने लागवड केली जाते. या अनुषंगाने यंदा अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. मूल्यसाखळी धोरणाचा अवलंब करून सोयाबीन, कापूस सह इतर कडधान्यांची उत्पादकता वाढवली जाणार आहे. खरिपातील पिके जोमात येतात मात्र परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान होते. हे नुकसान टळावे रस्ताही मूल्यसाखळी धोरणाचा अवलंब केला जाणार आहे.
हे ही वाचा (Read This ) या फुलाची लागवड करून मिळवा अधिकाधिक उत्पन्न, एक फुल ५० रुपये
मूल्यसाखळी धोरणाचा अवलंब म्हणजे काय ?
शेती व्यवसायात बदलत्या वातावरणामुळे धोके वाढले आहेत. त्याचा परिणाम उत्पादनावर होतांना दिसून येत आहे. पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी सरकारकडून काही उपाय योजना राबविल्या जात आहेत. यामध्ये आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा तसेच संभाव्य धोके ओळखून ते टाळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सोयाबीनचा काढणीच्या वेळी वातावरणाचा फटका बसत असल्यामुळे विकास आराखडा तयार करून मूल्यसाखळीच्या आधारे धोका टाळण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
हे ही वाचा (Read This ) हमीशिवाय दीड लाखांचे कर्ज, त्वरित करा अर्ज