इतर बातम्या

भाजीपाला दरात वाढ मात्र कांदा, बटाट्याचे काय?

Shares

दिवसेंदिवस वाढती महागाई पाहता सर्वच जण आता अर्थकारण सांभाळतांना दिसत आहेत. त्यात कडक उन्हाळा असल्यामुळे भाजीपाल्यांचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे बाजारभावात वाढ होतानाचे चित्र दिसून येत आहे. तर दुसरीकडे कांद्याचे आणिबटाट्याचा उत्पादन खर्च देखील निघत नाहीये.

फरसबी, घेवडा, वाटाणा यांचे दर तर प्रति किलो १०० रुपयांच्या वर गेले आहेत. भाजीपाला दरात वाढ मात्र कांदा, बटाट्याचे काय?

हे ही वाचा (Read This)  शेवगा लागवड करून मिळवा अधिक उत्पन्न, सरकार देणार अनुदान

मागणीच्या तुलनेत आवक कमी

मुंबई परिसरात प्रतिदिन साधरणतः ३ हजार टन भाजीपाल्याची आवश्यकता असते. तर पालेभाज्यांच्या ६ ते ७ लाख जुड्यांची आवश्यकता असते. मात्र उन्हाळामुळे पीक कमी प्रमाणात झाल्यामुळे अडीच हजार टन भाजीपाल्याची आवक होत आहे. मागणीच्या तुलनेत ही आवक कमी असल्यामुळे बाजारभावात अधिक वाढ होत आहे.

हे ही वाचा (Read This)  या पिकाची लागवड करून मिळवा १० वर्षापर्यंत भरघोस नफा

लिंबूच्या दरात तीनपट वाढ

एकीकडे कांद्याच्या दरामध्ये सतत घसरण होत आहे. तर दुसरीकडे लिंबू आणि इतर भाजीपाल्यांचे दर हे वाढत चालले आहेत. लिंबू २० ते ३० रुपये किलो प्रमाणे मिळत होते तर आता ६० ते १०० रुपये किलोने मिळत आहेत. एका लिंबाला ७ ते १० रुपये मिळत आहेत.

हे ही वाचा (Read This)  खरीप हंगामात शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणांचा तुटवडा भासणार नाही, उन्हाळी सोयाबीन बहरले !

एक जुडी १२ ते २० रुपयांना

पारंपरिक पीक घेणारा शेतकरी आता भाजीपाला, औषधी वनस्पतींकडे वळताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे हंगामी पीक घेतल्यास त्यास मुबलक अशी किंमत मिळत आहे. तेच दुसरीकडे सोयाबीन, कांदा , बटाटा याच्या दरामध्ये घसरण कधी स्थिरता दिसून येत असून लागवड खर्च देखील निघत नाहीये.

भाजीपाल्याच्या किमतींमध्ये वाढ होत असल्यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळत आहे. कारण अधिक अवकाळी सारख्या नैसर्गिक संकटांमुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे.

हे ही वाचा (Read This)  भारतीय गव्हाला जगात वाढली मागणी, एकूण 1 दशलक्ष टन गहू निर्यात, गव्हाला अजून चांगला दर मिळणार ?

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *