घरी गांडूळ खत तयार करत आहात, जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स
सध्याच्या काळात रासायनिक खतांचा वापर प्रमाणापेक्षा जास्त करत असल्यामुळे त्याचा दुष्परिणाम पिकावर तसेच जमिनीवर दिसून येत आहे. पूर्वी शेतकरी शेणखत (Manure), कंपोस्ट खत (compost), गाळाचे खत तसेच पिकांची फेरपालट यांचेद्वारे जमिनीची सुपिकता टिकवून ठेवत होते. आता जमिनीचीची सुपीकता दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे सेंद्रिय खतांचा (Organic Fertilizers) वापर करणे काळाची गरज झाली आहे. यासाठी सरकार (Government) देखील विविध योजना (Scheme) , कार्यक्रम राबवत आहेत. सेंद्रिय खतांमध्ये गांडूळ खत (Vermicompost) हे अतिशय फायद्याचे आणि महत्वाचे आहे. तुम्ही घरी सुद्धा गांडूळ खत तयार करू शकतात. आपण आज गांडूळ खताची माहिती जाणून घेणार आहोत.
गांडूळ खत तयार करण्यासाठी कोणत्या पदार्थांची आवश्यकता असते?
१. धसकटे, पेंढ, गवत, पालापाचोळा, कोंडा आदी पिकांचे अवशेष.
२. शेण, मूत्र, शेळ्यांची लेंडी आदी जनावरांपासून मिळणारे उप उत्पदिते.
३. शेतातील तण, ताग, गिरिपुष्प आदी हिरवळीचे खते.
गांडूळ खत तयार करतांना लक्षात ठेवायच्या महत्त्वाच्या बाबी-
१. गांडूळ वाफ्यात सोडण्या अगोदर वाफ्यावर १ दिवसाआधी पाणी मारावेत.
२. गांडूळ खत तयार करण्याचा प्रकल्प सावलीत तसेच दमट हवेशीर ठिकाणी करावा.
३. शेणखत तसेच शेतातील पिकांचे अवशेष यांचे प्रमाण ३:१ असे ठेवावे.
४. बारीक आणि वाळलेला पालापाचोळा खड्याच्या तळाशी १५ ते २० सेमी पर्यंत टाकावा.
५. वातावरणातील उष्णतेचा अंदाज घेऊन गांडूळ वाफ्यात टाकल्यानंतर पाणी फावरावेत.
गांडूळ खताचे फायदे –
१. गांडूळ खतामधील अन्नद्रव्ये पिकाला आवश्यक अशा स्वरूपात उपलब्ध असतात.
२. गांडूळ मधील सूक्ष्मजीवांमुळे रोगनिर्माण करणाऱ्या सूक्ष्मजीवांचा नाश होतो .
३. पिकावर येणारी रोगराई कमी होते. त्यामुळे कीडनाशकांचा खर्च कमी होतो.
४. गांडूळ खतामुळे पाण्याचा योग्य निचरा होतो व जमिनीची जलधारण क्षमता वाढते.
५. गांडूळ खताची रचना कणीदार असते त्यामुळे ते मातीचे कण धरून ठेवते व वाऱ्यामुळे, पाण्यामुळे होणारी जमिनीची धूप कमी होते.