वांग्याची शेती करा आणि लखपती बना …
भाज्यांच्या विविध प्रकारांमध्ये वांगे हा प्रकार सर्वांनाच परिचित आहे. वांग्याचे पीक जवळपास सर्वच भागांमध्ये घेतले जाते. कमी पाण्याचा भाग आणि दुष्काळी प्रदेशात हे पीक मोठया प्रमाणात घेतले जाते. वांग्यातून विविध जीवनसत्वे मिळतात.
*कशी असावी वांगे लागवडीसाठी आवश्यक जमीन :-
वांगे हे विविध प्रकारच्या जमिनीमध्ये घेता येते. ज्या जमिनीत पाणी साठून न राहता पाण्याचा योग्य निचरा होतो अशी जमीन वांगे लागवडीसाठी फायदेशीर ठरते. उत्पादन चांगले येण्यासाठी मातीचा पीएच ५.५ ते ६.६ असावा. कार्बोनेटचे प्रमाण असल्यास पिकाला अधिक फायदा होतो.
*कुठले हवामान योग्य?
बाराही महिने घेता येणारे हे पीक रबीच्या हंगामात जास्त फायदा देऊन जाते.
*अशी करा लागवड :-
वांग्याची रोपे तयार करावी लागतात, यामुळे शेतात चांगल्या प्रकारे लागवड करता येते. चांगल्या प्रतीची रोपे येण्यासाठी ७.५ × १.५ मीटर आणि 10 ते 15 सेमी उंच आईस्ड बेड तयार करावे. रोपाचे बीज 2-3 सेमी खोलीत पेरले जायला हवे आणि वरून मातीची एक हलकी लेअर करून घ्यावी. थोड्याच प्रमाणात पाणी द्यावे. जोपर्यंत पिकाला अंकुर फुटत नाही तोपर्यंत पाणी कॅन द्वारे आवश्यकतेनुसार द्यायला हवे. वांग्याचे रोपे ही शक्यतोवर संध्याकाळी लावावी.
*साधारणपणे किती अंतरावर लागवड योग्य :-
लांब वांग्यांची रोपे :- 60 × 45 सेमी अंतरावर लागवड योग्य
गोलाकार वांग्यांची रोपे :- 75 × 60 सेमी अंतरावर लागवड योग्य
जास्त उत्पादन देणाऱ्या जातीच्या वांग्याची रोपे 90 × 90 सेमी अंतरावर लागवड योग्य
*कसे असावे पाणी व्यवस्थापन:–
वांग्याला अतिजास्त प्रमाणात पाण्याची आवश्यकता नसल्याने कोठेही ही लागवड करता येते. वांग्याच्या रोपांच्या तळभागात थंडावा टिकवून ठेवावा. लागवडीनंतर पहिल्या व तिसऱ्या दिवशी पाणी द्यावे. हिवाळ्यात 7-8 दिवसाला पाणी द्यावे आणि उन्हाळ्यात 5-6 दिवसाला पाणी द्यावे.
*कधी करावी वांग्याची तोडणी:-
एवढी मशागत झाल्यानंतर महत्वाचा भाग म्हणजे वांग्यांची तोडणी. ही वांग्याची तोडणी वांगे जोपर्यंत चमकदार व कोवळी असेपर्यंत करायला हवी. कारण नंतर वांगी निब्बर होऊ लागतात.
असे कुठल्याही जमिनीत घेता येणारे हे वांग्याचे पीक शेतकऱ्याने घेतले आणि योग्य काळजी घेतली तर बाराही महिने उत्पादन देणारे हे पीक अतिशय चांगला नफा मिळवून देते.
ब्युरो रिपोर्ट – किसानराज डेस्क