वाढती थंडी रब्बी पिकासाठी पोषक ठरणार !
खरीप हंगामात बदलत्या वातावरणामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला होता. त्यामुळे यावेळेस शेतकर्यांच्या रब्बी हंगामात घेतल्या जाणार्या पिकांकडून भरपूर अपेक्षा आहेत. अवकाळी पडलेल्या पावसामुळे रब्बी पिकांची पेरणी करण्यास उशीर झाला होता. शेतकर्यांनी नंतर कशीबशी पेरणी केली होती. परंतु अवकाळी पडलेल्या पावसामुळे पिकांवर वाईट परिणाम होईल असे जाणवायला लागले होते. खरीप हंगामात झालेल्या नुकसानीमूळे शेतकर्यांना वाटले आता रब्बी हंगामात चांगले उत्पादन मिळवता येईल.
मराठवाड्यातील अनेक ठिकाणी तर पुन्हा पेरणी करावी लागली होती. मात्र आता मराठवाड्यात छान थंडी पडली आहे. त्यामुळे पिके बहरण्यास सुरुवात झाली आहे. थंडी मुळे रब्बी पिकास पोषक असे वातावरण निर्माण झाले आहे. येत्या काही दिवसात हवामान कोरडे असण्याचा अंदाज दर्शवला जात आहे. त्यात वाढती थंडी पाहता शेतकरी सुखावला आहे. गहू, ज्वारी, हरभरा पिके आता बहरतांना दिसत आहेत.
सुरवातीला अवकाळी पावसामुळे पिकांना मोठा फटका बसला होता. पिकांची वाढ होण्यापूर्वीच त्यावर रोगांचा प्रादुर्भाव दिसून आला होता. हरभरा पिकावर मर, घाटेआळीचा प्रादुर्भाव झाला होता. मात्र आता वाढत्या थंडीने शेतकर्यांना मोठा दिलासा दिला आहे. शेतकर्यांना आता पर्यंत असे वाटत होते की खरीप हंगामाप्रमाणे रब्बी हंगामात देखील पिकाचे नुकसान आपल्याला सहन करावे लागेल. परंतु कमालीच्या पडलेल्या थंडीचा रब्बी पिकांसाठी चांगला फायदा होणार आहे. आता रब्बी हंगामात चांगले भरोघोस उत्पन्न होईल असे दिसून येत आहे.
पिकाणावर रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल तर त्यावर निंबोळी अर्काची फवारणी करावी आणि जास्तच गरज असेल तरच रासायनिक फवारणी चा वापर करावा असे कृषि वैज्ञानिक ने सल्ला दिला आहे.