दुष्काळात तेरावा महिना, खतांच्या दरात वाढ
शेतकऱ्यांना ज्याची भीती होती तेच आता घडले आहे. खतांच्या दरामध्ये वाढ झाली आहे.
सरकारने खरीप हंगामाच्या अनुषंगाने खतांच्या दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून ऐनवेळी मागणीत वाढ होऊन खतांचा तुटवडा निर्माण होऊ नये.
खरीप आता तोंडावर आले आहे आणि अश्यात खतांच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. डीएपी खताची सर्वात जास्त मागणी असते तर आता डीएपी खताची बॅग ही आता 1 हजार 350 रुपयांना मिळणार आहे. म्हणजेच या खताच्या दरामध्ये दीडशे रुपयांची वाढ झाली आहे.
सर्वाधिक वापर होणाऱ्या खताच्या दरात वाढ
खरीप हंगामात तूर, हरभरा, मूग, कापूस, सोयाबीन अश्या मुख्य पिकांची लागवड केली जात असून या पिकास डीएपी खताची मात्रा द्यावी लागते. दरवर्षी या खताचा किमतीमध्ये वाढ होत आहे. तर याच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नाहीये. त्यामुळे कृषी विभागाकडून वेगवेगळ्या खतांचा वापर करा, असे आव्हान दिले जात आहे. मात्र शेतकऱ्यांकडून डीएपी खतास जास्त पसंती दिली जात आहे.
हे ही वाचा (Read This ) उन्हाळी सोयाबीनला शेंगा लागत नाहीये, दोष कोणाचा?
डीएपी (18:46) खतावर पर्याय काय?
कृषी विभागाकडून डीएपी खताच्या पर्यायी इतर वेगवेगळ्या खतांचा अवलंब करण्याचे आव्हान दिले जात आहे. डीएपी खताच्या मागणीच्या तुलनेत त्याचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. मात्र डीएपी खताऐवजी शेतकरी 10:26:26, 12:32:16, 15:15, 20:20:00 खतांचा वापर करू शकतात. कृषी विद्यापीठाने शिफारस केलेली खते आहेत त्यामध्ये नायट्रोजन, फॅास्परस यांचे मिश्रण करुनही वापर करता येत असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा (Read This ) एका एकरात लागवड करा मिळवा ६ लाख रुपये, बाराही महिने करता येते लागवड
रशिया- युक्रेन युद्धामुळे रासायनिक खतांसाठी गरजेच्या असणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा वेळेत झाला नाही. भारतास सर्वात जास्त प्रमाणात खत हे रशिया मधून पुरवले जाते. तर युद्धाचा परिणाम आयातीवर झाला आहेत. साठवणूक केलेले खत सरकारने जिल्हानिहाय पुरवले असल्याचे सांगण्यात आले आहे.