इतर बातम्या

या शेतकऱ्यांना मिळणार ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान, यादी तयार

Shares

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमाफी अंतर्गत प्रत्येकी ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. मात्र ही कर्जमाफी नियमित कर्जदार असणाऱ्या शेतकऱ्यांना नाही तर २०१७-१८ पासून २०२० पर्यंत थकबाकीत नसलेल्यांना लाभ घेता येणार आहे.

हे ही वाचा (Read This ) दुग्ध व्यवसायासाठी बिना गॅरेंटी ४ लाखांचे लोन

यासाठी जिल्हा बँकेचे ३५ हजार ८७९ तर राष्ट्रीयकृत बँकेचे साधरणतः जवळजवळ १९ हजार शेतकरी पात्र ठरतील.

नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांची यादी तयार?

सर्वप्रथम ५० हजारांचे अनुदान हे नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. ज्यांनी २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० या ३ वर्षात कर्जाची नियमित परतफेड केली आहे त्यांना प्रोत्साहपर अनुदान देण्यात येणार आहे.

हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांसाठी महत्वाचे, जिप्समचा वापर केव्हा आणि कसा करावा, काय घ्यावी काळजी ?

या तीन वर्षातील नियमित कर्जदारांची माहिती देताना शेवटच्या रकान्यात त्या तीन वर्षांत किती शेतकरी नियमित कर्जदार राहिले, याची माहिती दिली आहे. त्यानुसार जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने त्यांच्याकडील ३५ हजार ८९७ शेतकऱ्यांची यादी जिल्हा उपनिबंधक कार्यालयास सादर झाली आहे. दुसरीकडे राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या जिल्ह्यातील ५५ शाखांमधील जवळपास १९ हजार शेतकऱ्यांचीही यादी पाठविण्यात आली आहे.

हे ही वाचा (Read This ) नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना – शेत-शिवाराचे होणार कायापालट, 75% मिळणार अनुदान

कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर अनुदानाचा विषय मार्गी लावण्यात येईल

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडून किंवा राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून व्याजमाफी दिली जाते. आता तीन लाखांपर्यंतचे कर्ज शेतकऱ्यांना शून्य टक्‍के व्याजाने वितरीत केले जात आहे. सव्वादोन वर्षांपूर्वी जाहीर केलेली कर्जमाफी अजूनही संपूर्ण शेतकऱ्यांना मिळालेली नाही.

अधिवेशनात विरोधी पक्षांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्‍नांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर देताना स्पष्ट केले की, दोन वर्षांत दोन लाखांवरील कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर अनुदानाचा विषय मार्गी लावला जाईल.

हे ही वाचा (Read This) नाबार्ड डेअरी योजना, ५० टक्के अनुदान

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *