सोयाबीन बहरून देखील उत्पादन घटण्याचा धोका
खरीप हंगामात अतिवृष्टी, अवकाळीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी काहीही पडले नाही. त्यामुळे उन्हाळी सोयाबीनची लागवड करून थोड्या प्रमाणात का होईना पैसे पदरी पडतील या अपेक्षेने सोयाबीनची लागवड केली आहे. त्यामुळे सगळीकडे सोयाबीन बहरतांना दिसत असला तरी उत्पादन मात्र होत नसल्यामुळे शेतकरी आता चिंतेत पडला आहे.
हे ही वाचा (Read This) शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार खत अनुदानात सुधारणा करण्याच्या तयारीत
नेमका दोष कोणाचा ?
महाबीज बीज प्रक्रिया केंद्र आष्टा या कंपनीने शेतकरी मेळावे गावोगावी आयोजित केले होते. या मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांना उन्हाळी सोयाबीन घेण्यासाठी प्रोत्साहित केले गेले. तर त्याबरोबर बाजारभावापेक्षा अधिक २५ % दराने सोयाबीन खरेदी करणार अशी हमी दिली होती. त्यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात टोकण पद्धतीने जवळजवळ शंभर एकरात लागवड झाली.
कंपनीने एक छापील वेळापत्रक दिले त्यामध्ये खते, औषधांची मात्रा दिलेली होती. सर्व पाहता ४० ते ४५ दिवसात फुलकळी येणे अपेक्षित होते. परंतु तसे न घडता अगदीच कमी प्रमाणात फुलकळ्या आल्या असून ७० ते ८० दिवसानंतर या फुलकळ्या लागल्या.
हे ही वाचा (Read This) पोल्ट्री उद्योग अडचणीत, उत्पानांपेक्षा खर्च जास्त तर अंडयांच्या दरात घसरण
सदोष बियाणांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
कंपनीने सदोष बियाणे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करावेत आणि योग्य अशी भरपाई मिळवून द्यावी असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांनी कृषी आयुक्त, जिल्हा कृषी अधिकारी, महाबीज प्रक्रिया केंद्र, ग्राहक पंचायतकडे लेखी तक्रार केली आहे.
शेतकऱ्यांवर उपोषण करण्याची वेळ
वातावरणात झालेल्या बदलामुळे चार महिन्यात सोयाबीनवर चार वेळा फवारणी करावी लागली होती. शिवाय मशागत, पेरणी याचा खर्च हा वेगळाच. एकरी 10 हजार रुपये खर्चून आता पीक पदरी पडण्याच्या अवस्थेत हे भयाण वास्तव समोर आले आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा सामना केल्यानंतर शेतकऱ्यांना आता महाबीज कंपनीशी दोन हात करावे लागत आहेत. मात्र, कंपनीकडून दाद दिली जात नसल्याने शेतीकामे सोडून शेतकऱ्यांना न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे
हे ही वाचा (Read This) आता नोकरी १२ तासांची, पगार पण कमी, पीएफ वाढणार- १ जुलैपासून मोदी सरकार लागू करणार नवे नियम ?
कंपनीने प्रति हेक्टर २५ ते ३० क्विंटल उत्पादनाचा दावा केला होता. मात्र सोयाबीनला मुबलक प्रमाणात फुलकळ्यांचा बहर आलेला नाही. फुलकळ्या येऊन देखील शेंगा लागलेल्या नाही. उलट पीक पिवळे पासून सुकून जात आहे. त्यामुळे उत्पादन खर्च निघणे देखील अशक्य आहे.
हे ही वाचा (Read This) रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरात भारतीय गव्हाची चमक वाढली, कोणत्या देशात किती निर्यात झाली?
पाहिजे तशी फुले येत नाहीये..
सध्या ४४९ हेक्टर शेतजमिनीवर उन्हाळी सोयाबीन पिकाचा पेरा झाला आहे. असे असले तरी आठही तालुक्यात या पिकाला पाहिजे त्या प्रमाणात फुले येत नसल्याची तक्रार सध्या शेतकरी करीत आहेत.
२०२१ मध्ये खरीप हंगामात जिल्ह्यात १७ हजार ८६० शेतकऱ्यांनी १ लाख २९ हजार ५२८ हेक्टरवर सोयाबीन पिकाची लागवड केली होती. यंदा किमान ९०९ हेक्टरवर उन्हाळी सोयाबीनची लागवड होण्याची अपेक्षा कृषी विभागाला होती. प्रत्यक्षात जिल्ह्यातील आठही तालुक्यात ४४९ हेक्टरवर उन्हाळी सोयाबीनचा पेरा झाला आहे.
हे वाचा : एसटी कर्मचारी कामावर परतण्यास सुरवात