आजच्या शेती मधे नवयुवकांची भूमिका फार मोलाची – वाचाल तर वाचाल
नमस्कार मंडळी मी मिलिंद जि गोदे आपल्या साठी थोडं पण महत्वाचे विषय आहे सेंद्रिय शेतीचा आजच्या शेती मधे नवयुवकांची भूमिका फार मोलाची आहे हि माहिती जेवढी लवकर जाणवेल तेवढे चांगले आहे. कारण आजवर शेती जी केली जाते ती जास्तीत जास्त पारंपारिक व ढोबळमानाने. सध्याच्या तसेच यापुढील कालावधीत शेती हि पारंपारिक आणि आधुनिक पद्धतींची सांगड घालणे महत्वाच व आवश्यक आहे. काही गोष्टी शेती मधे अश्या असतात त्या पारंपारिक पद्धतीने करणे गरजेचेच असते. त्यातून चांगला लाभ होण्यास मदत होते.
या शेतकऱ्याने केले चमत्कार! पिकवला हिरवा तांदूळ,विकला जातो 500 रुपये किलोने, शुगर, कॅन्सरसारखे आजार होतात बरे
तर काही गोष्टी आधुनिक पद्धतीने केल्यास त्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो. आपल्या साठी आर्थिक दृष्ट्या काही गोष्टी समजणे अधिक महत्वाचे आहे. मोठे तज्ञ म्हणतात कि, ज्या देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असते तो देश अप्रगत असतो किंवा प्रगती करण्याच्या वाटेवर असतो. तसेच ज्या देशाची अर्थव्यवस्था औद्योगिक गोष्टींवर अवलंबून असते तो देश प्रगत असतो. असे असताना हि गोष्ट देखील खोडून काढली जावू शकते. ज्या वेळी तरुण पिढी सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यास प्राधान्य द्यायला सुरुवात करेल.
मधुमेह: ही फळे खाल्ल्याने कमी होईल रक्तातील साखरेची वाढ, मधुमेह दूर होईल
तरुण पिढीमध्ये क्रांती करण्याची क्षमता जास्त असते, हे आपण आपल्या इतिहासातून समजूच शकतो. तसेच आपल्या भारत देशात तरुणांची संख्या जास्त आहे. आज जर तरुण पिढी शेतीकडे वळली तर आधुनिक शेती मधे क्रांती होणे सोपे होईल. शेतीकडे वळून पळनार नाही, तर सेंद्रिय पद्धतीने शेती करणे आवश्यक आहे हे लक्षात येईल सर्वच दृष्टीने अभ्यासपूर्वक शेती करणे महत्वाचे आहे. शेती करताना धान्य पिकविणे जसे महत्वाचे आहे ज्यातून आपली गरज भागवून काही प्रमाणात आपण त्याची निर्यात करतो. या सोबतच अजून शेतीमध्ये अशा संधी आहेत ज्यांची आपण आपल्या देशाची गरज भागवून त्यांची मोठ्या प्रमाणात निर्यात करू शकतो.
या भाज्यांमुळे शरीर लोहासारखे मजबूत होईल, जाणून घ्या सेवन कसे करावे
आताही करतच आहोत परंतु जर त्या गोष्टी सेंद्रिय पद्धतीने पिकविल्या तर त्यांना चांगली मागणी वाढेल व आपल्याला त्याचा मोबदला चांगला मिळण्यास मदत होईल.या सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीने करायच्या असतील तर तरुणांना सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याकडे वळणे आवश्यक आहे. कारण त्यात त्यांची भूमिका मोठी आहे व महत्वाची देखील तितकीच आहे. आधुनिक शेतीक्रांती होणे म्हणजे त्यात प्राधान्य सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यालाच असले पाहिजे. तसेच शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन हा बदलला पाहिजे. जसे औद्योगिक क्षेत्राकडे पाहिले जाते तसेच शेती क्षेत्र तेवढेच महत्वाचे आहे, किंबहुना शेती सर्वच क्षेत्रांपेक्षा अधिक महत्वाची आहे. त्याची तुलना कशाशीच होवू शकत नाही.
शुगर फ्री पेरू : शुगर फ्री पेरू पिकवणारी ही महिला शेतकरी अनेकांसाठी उदाहरण बनली आहे
कारण जगातील प्रत्येक जीवाला खाण्यास लागते तेच खाण्यासाठी लागणारे अन्न जर चांगले मिळाले तर किती बरे होईल ना… म्हणून शेतीच सर्वच दृष्टीने सजिवाचे मूळ आहे. त्याकडे तरुणांनी तर वळणे गरजेचेच आहे परंतु सर्वांनीच त्याचे महत्व समजणे आवश्यक आहे.अशा एक नाही तर अनेक गोष्टी आहेत ज्यातून असे दिसून येईल कि सेंद्रिय शेती करणे किती आवश्यक आहे. आवश्यक तर आहेच परंतु नक्की सेंद्रिय म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. सोबतच नव युवकाची सेंद्रिय शेतीतील भूमिका काय आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. सेंद्रिय शेती करणे काळाची गरज आहे.
मालवी गाय: ही आहे सर्वात सुंदर गाय, कमी किंमत आणि जास्त दूध, वाचा संपूर्ण माहिती
त्यामध्ये शेती कोणत्या प्रकारची आहे, त्यात कोणते पिक घेणे सोपे पडेल, वातावरण कोणते आहे. कशाला चांगला मोबदला मिळेल अशा सर्व प्रकारच्या गोष्टींचा अभ्यास हा पिक लागवडीपूर्वी केला गेला पाहिजे. ज्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळतील व शेतात देखील नवीन नवीन प्रयोग चांगल्या प्रकारे केले जातील. ज्यातून फायदा होतो त्यांची प्रसिद्धी करून नवीन गोष्टी होवू शकतात. सेंद्रिय शेतीमध्ये अनेक गोष्टी आहेत त्यासाठी खूप काही खते किंवा औषधे विकत आणण्याची देखील गरज पडत नाही. ती आपण स्वतः शेतावर तयार करू शकतो. तसेच ते ज्यांना हवे त्यांना पुरवू शकतो अशा अनेक गोष्टी आहेत ज्या केल्या जावू शकतात..पण सुरुवात स्वतःपासून करावी लागते…..
मधुमेह: हे फळ खाल्ल्याने बरे होतील रक्तातील साखरेसह अनेक आजार, जाणून घ्या कसे करावे सेवन
धन्यवाद मित्रांनो आपला मित्र
मिलिंद जि गोदे
कृषी विकास व तंत्रज्ञान
समुह
Mission agriculture soil information
milindgode111@gmail.com
सर्पदंश : पावसाळ्यात सर्पदंशामुळे मृत्यूचे प्रमाण वाढू लागले आहे, साप चावल्यानंतर हे काम करू नका
OMG ! शेतीतून एवढा पैसा कमावला की आता हा शेतकरी घेणार हेलिकॉप्टर, जाणून घ्या काय आहे प्रकरण
रियल्टी चेकः भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले, तरीही शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही, का?
भारतीय रेल्वे भरती 2023: दक्षिण पश्चिम रेल्वेमध्ये शिकाऊ पदाची जागा, 10वी पास अर्ज