सोयाबीनला ८ हजाराचा भाव, लवकरच ९ हजाराकडे वाटचाल
काही दिवसांपासून सोयाबीनच्या भावात स्थिरता होती सध्याच्या स्थितीत सोयाबीनला चांगला दर मिळत असून, कमीत कमी सात तर जास्तीत जास्त आठ हजाराच दर सोयाबीनला स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समीतीत गाठला आहे. काही शेतकऱ्यांना आठ हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला असून, काही महिन्यान पूर्वी नैसर्गिक संकट व आर्थिक अडचणीपोटी शेतकऱ्यांना खुल्या बाजारात तीन ते साडेतीन हजार रुपये भावाने सोयाबीन विकावे लागले होते. या भाववाढीचा फायदा शेतकर्यांना होत असल्याचे पाह्यला मिळत आहे.
हे ही वाचा (Read This ) एका एकरात लागवड करा मिळवा ६ लाख रुपये, बाराही महिने करता येते लागवड
अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनची मागणी वाढल्याने सोयाबीनच्या दारात वाढ होताना दिसून आलं. शासनाच्या हमीभाव पेक्षा तुरीला आणि सोयाबीनला अधिकचा भाव मिळत असल्याचे दिसून येत आहे. तब्बल ६१० पोती सोयाबीन दर्यापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितमध्ये बुधवारीची आवक झाली. कमीत कमी सात हजार रुपये, तर उच्च दर्जाचा सोयाबीन तब्बल आठ हजार रुपये प्रतिक्विंटल या दराने खरेदी करण्यात आला.
हे ही वाचा (Read This ) दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2 लाखापर्यंत मर्यादा असलेले KCC कार्ड, तुम्हीही याप्रमाणे लाभ घेऊ शकता
हे ही वाचा (Read This अभ्यासपूर्वक शेती करणं हि आता काळाची गरज…खूप महत्वाचं एकदा वाचाच
दरम्यान हंगामाच्या शेवटी हा दर मिळत असल्याने शेतकरी नाराज आहे. तसेच उन्हाळी सोयाबीन देखील हाती येत आहे मात्र अध्याप त्यांचा हवा तसा विकास झाला नाही. अवघ्या २ ते ३ महिन्यात काढणीला येणार पिक असूनही सोयाबीन पिकला लागणारी फुल, शेंगा अध्याप कमी प्रमाणात दिसत असून, उन्हाळी हंगामात सोयाबीनला कमी उतारा असल्यामुळे उत्पादन पेक्षा खरिपातील बियाण्याचा प्रश्न मिटेल यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे पीक घेत आहेत. साठवणूक करणाऱ्या काहीच शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक आहे. काहींनी खरीप हंगामाच्या बियाण्यांसाठी सोयाबीन राखून ठेवले आहे. एकंदर सोयाबीनच्या दरात वाढ होत असल्याने बड्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे