इतर बातम्यायोजना शेतकऱ्यांसाठी

शेतकऱ्यांनो कृषिपंपाच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी राहिले शेवटचे काही दिवस

Shares

कृषीपंपाच्या थकबाकीवरून अनेक ठिकाणी आंदोलन सुरु असले तरी शेतकरी महावितरणच्या योजनेमध्ये सहभाग नोंदवून कृषिपंप वीजबिल कोरे करू शकणार आहेत.

वीजबिलात ५० % माफीसाठी आता केवळ २२ दिवस उरलेले आहेत. शेतकऱ्यांनी थकीत बिलापैकी ५० % रक्कम अदा केल्यास उर्वरीत ५० % माफी ही होणारच आहे. राज्य सरकारने कृषी धोरण २०२० या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ही सुविधा देण्याचा निर्धार केला असून मागील काही दिवसांपासून ही योजना सुरु आहे.

हे ही वाचा (Read This ) आधुनिक शेती काळाची गरज, व्हर्टिकल फार्मिंग

योजनेचे मुख्य स्वरूप

शेतकऱ्यांनी ५० %रक्कम अदा करुन त्या रकमेचा वापर हा शेतकऱ्यांना सुरळीत विद्युत पुरवठा करण्यासाठी होणार आहे. सप्टेंबर २०२० च्या अखेर पर्यंत असलेल्या थकबाकीतील दंड व्याज माफ करून व्याजाचे पुनर्रगठण करून, वीज बिलाची दुरुस्ती करून सुधारित थकबाकी निश्चित केली आहे.

यानुसार सुधारित थकबाकीवर ५० % कर्ज माफी तर बाकी उर्वरित ५० % वासून करून थकबाकीमुक्त करण्याचे धोरण सरकारने ठरवले आहे. वसूल झालेल्या रकमेपैकी ६६ % ही कृषी आकस्मित निधीतून वीज यंत्रणेतील विकास कामासाठी खर्च करण्यात येणार आहे.

हे ही वाचा (Read This ) रंगीत फुलकोबीची शेती करून कमवा लाखों रुपये

कामाचे स्वरूप कसे आहे ?

शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर अनेक अडचणी असल्यामुळे त्यांची कामे रडखडली आहे. त्यामुळे अनेक सोयीसुविधांकडे त्यांचे दुर्लक्ष होते. तर शेतकऱ्यांनी या योजनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रडखडलेली कामे कशी पूर्ण करता येईल यावर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे.

काही परिमंडळामध्ये अनेक विकास कामे सुरु झाली असून ३० मीटरच्या आतील कृषिपंपाच्या जोडण्या सुरु केल्या जाणार असून सध्या ३१ ते १०० मीटर अंतरावर कामे सुरु झाली आहेत.

अनेक शेतकऱ्यांची कृषिपंपाची थकबाकी वाढत असल्यामुळे महावितरणाने वीज खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कृषीपंपाची थकबाकी तसेच त्यावरील व्याज यामध्ये सवलत देत १५ हजार ९६ कोटी ६६ लाख रुपये माफ करण्यात आले आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *