थंडीत कोंबड्यांची काळजी कशी घ्यावी
थंडीच्या दिवसात कोंबड्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते .त्यांच्या खाद्यांची निवड , शेडचे योग्य व्यवस्थापन केले गेले पाहिजे.थंड वातावरण असेल तर चांगल्या उत्पादनासाठी कोंबड्यांची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे . तसे न केल्यास आपले आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. चला तर जाणून घेऊयात कशी घ्यावी कोंबड्यांची काळजी.
खाद्य व्यवस्थापन –
१. मांसल कोंबड्यांना संतुलित आहार दिल्यास त्यांची वाढ योग्य प्रमाणात होते.
२. कोंबड्यांना तीन प्रकारचे खाद्य दिले जाते.
१. प्री स्टार्टर खाद्य – ३०० ते ५०० ग्रॅम प्रति पक्षी
२. स्टार्टर खाद्य – ७०० ते १००० ग्रॅम प्रति पक्षी
३. फिनिशर खाद्य – ३००० ग्रॅम किंवा त्यापेक्षा जास्त प्रति पक्षी
३. हिवाळ्यात तापमान कमी झाल्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यासाठी कोंबड्या जास्त प्रमाणात खाद्य खातात. त्या खाद्यातून त्यांना जास्तीत जास्त ऊर्जा कशी भेटेल याची काळजी घेतली पाहिजे.
४. ऊर्जा पुरवठा करणाऱ्या तेल व स्निग्ध पदार्थाचे प्रमाण आहारात वाढवावेत.
५. ४० ते ५० कोंबड्यांमध्ये एक खाद्याचे भांडे या प्रमाणे शेडमध्ये भांडी ठेवावीत.
पाणी व्यवस्थापन –
१. कोंबड्यांचे आरोग्य व स्वास्थ टिकून राहण्यासाठी त्यांना स्वछ , ताजे , जंतुविरहित पाणी द्यावे. शेडमध्ये ६० ते ७० कोंबड्यांमध्ये एक भांडे ठेवावेत.
२. तज्ज्ञांच्या सल्याने आठवड्यातून एकदा गुळाचे पाणी द्यावे.
३. लहान पिल्लाना पिण्याचे पाणी कोमट करून देणे.
शेडचे व्यवस्थापन –
१. कोंबड्यांना हिवाळ्यात सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते त्यानुसार प्रकाशाची व्यवस्था करावीत.
२. पडदे बंद असल्यास एक्झॉस्ट पंख्याची सोय करावी.
३. थंड वारे शेडच्या आत शिरू नये यासाठी छत उघडे ठेवू नये. छत फुटले असेल तर लवकर दुरुस्त करून घ्यावे.
४. शेडमधील सांडलेले खाद्य , कोंबड्यांची विष्ठा नियमित स्वछ करावे.
५. गादीच्या थराची जाडी ३ ते ४ इंच पर्यंत वाढवून घ्यावीत. गादी वेळच्या वेळी खाली वर करावी.
६. शेडमध्ये कोंबड्यांसाठी कृत्रिम ऊर्जेचे व्यवस्थापन करावे.
अश्या प्रकारे थंडीत कोंबड्यांची काळजी घ्यावी जेणेकरून आपल्या उत्पन्नात वाढ होईल .