पशुधन

थंडीच्या दिवसात अशी घ्या पशूंची काळजी ..

Shares

शेती म्हंटले की जोडीने पशुपालन आलेच. अनेक वर्षांपासून भारतात पशुपालन केले जाते. अल्पभूधारकाबरोबर भूमिहीन देखील पशुपालन करून आपला उदरनिर्वाह भागवत आहेत. पशुपालन करतांना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. थंडीच्या दिवसात तर पशूंची जास्त बारकाईने काळजी घ्यावी लागते.
भारतात नोव्हेंबर महिन्यापासून थंडीची सुरुवात होते. गाई – म्हशींना निरोगी राहण्यासाठी सभोवतालच्या तापमानासोबत जुळवून घ्यावे लागते. हिवाळा आला की थंडीपासून बचाव व्हावा यासाठी अनेक प्राणी आपल्या त्वचेखाली चरबी साठवून ठेवतात जी त्यांच्या शरीराची उष्णता वाढवते. थंडीमुळे शरीर गोठू नये यासाठी पशु शरीरातील रक्त प्रवाह वाढवतात. नैसर्गिकरित्या पशु शक्य तेवढी त्यांची काळजी घेत असतात. परंतु त्यांना योग्य आहाराची गरज पडतेच. थंडी जास्त वाढली असेल तर दुग्धजन्य पशूंवर याचा परिणाम होतो. दूध उत्पादनात घट होते. याचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसतो. पशूंच्या शरीरावर विपरीत परिणाम नाही व्हावा यासाठी पशूंची काळजी घेणे गरजेचे आहे.

थंडीच्या दिवसात कशी घ्यावी पशूंची काळजी –
१. पशूंच्या गोठ्यातील तापमान आवश्यकतेनुसार वाढवावेत.
२. दुपारी व्हेंटिलेशन केले पाहिजे.
३. आद्रता कमी करून शेडमध्ये जास्त ओलावा तसेच छताला गळती राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
४. जमीन गोठण्यापासून रोखावी.
५. थंडीच्या दिवसात जमीन धुण्यासाठी शक्य तेवढे कमी पाणी वापरावेत.
६. गोठ्याची स्वछता ही कोरड्या पद्धतीने करावीत.
७. दुपारी जेवण झाल्यानंतर जनावरांना उन्हात गोठ्याबाहेर ठेवावेत.
८. पिण्यासाठी पशूंना कोमट पाणी द्यावे.
९. थंडीच्या दिवसात पशूंची भूक वाढते तेव्हा त्यांना अतिरिक्त चाऱ्याचा पुरवठा केला पाहिजे.

थंडीच्या दिवसात पशूंची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे ठरते. वरील सांगितल्याप्रमाणे थोडी काळजी घेतल्यास उत्पादनात घेत होत नाही .

Shares